BSNL ने आपल्या यूजर्स साठी Rs 949 च्या किंमतीत येणारा नवीन प्लान सादर केला आहे, हा प्लान कंपनी ने BSNL Maha Plan 949 या नावाने सादर केला आहे.
BSNL ने आपल्या यूजर्स साठी Rs 949 च्या किंमतीत येणारा नवीन प्लान सादर केला आहे, हा प्लान कंपनी ने BSNL Maha Plan 949 या नावाने सादर केला आहे. या नवीन प्लान मध्ये तुम्हाला एक वर्षासाठी शानदार ऑफर्स मिळत आहे. आता काही दिवसांपूर्वी कंपनी ने आपल्या या प्लान ला रिवाइज्ड केले होते आणि यात काही जास्त फायदे तुम्हाला ऑफर केले होते. आणि आता या प्लान मध्ये तुम्हाला 157GB डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि 100 SMS प्रतिदिन या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहेत. या प्लान ची वैधता 157 दिवसांची आहे. या प्लानची खरी वैधता 365 दिवसांची आहे, पण यातील डेटा आणि इतर फायदे तुम्ही फक्त 157 दिवसांसाठी वापरू शकता. तसेच या प्लान ची एक बाब म्हणजे हा प्लान तुम्ही भारतात सगळीकडे वापरू शकत नाही. हा नार्थ ईस्ट, जम्मू आणि कश्मीर सह आसाम राज्यात उपलब्ध नाही. जर बारकाईने बोलायचे झाले तर BSNL च्या या नव्या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉल्स कोणत्याही नेटवर्क वर मिळत आहेत. त्याचबरोबर याला तुम्ही सर्व रोमिंग मध्ये पण वापरू शकता, याला तुम्ही दिल्ली आणि मुंबई सोडून कुठेही वापरू शकता. या वॉईस कॉलिंग लाभ सोबत या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डेटा प्रतिदिन च्या हिशोबाने मिळत आहे. सोबतच यात तुम्हाला 100 SMS प्रतिदिन या हिशोबाने मोफत SMS पण मिळत आहेत. जर तुम्ही या प्लान चा वापर 157 दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी केला तर 158 ते 365 दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्क वर कॉल करण्यासाठी 60 पैसे प्रति मिनिट च्या हिशोबाने पैसे द्यावे लागतील. तसेच SMS साठी तुमच्याकडून 25 पैसे घेतले जातील. त्याचबरोबर जर तुम्ही STD वर मेसेज करत असाल तर अशा मेसेज साठी तुम्हाला 35 पैसे मोजावे लागतील.