भारीच की ! BSNL ने आणले दोन उत्तम रिचार्ज प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह मिळेल वर्षभराची वैधता
BSNL ने आणले दोन जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स
या प्लॅनमध्ये वर्षभराची वैधता उपलब्ध
ज्या युजर्सना डेटापेक्षा जास्त कॉलिंगची गरज आहे, अशा युजर्ससाठी उत्तम प्लॅन
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL यूजर्सना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लॅन आणत आहे. अलीकडेच आता कंपनीने आपले दोन नवीन प्लान लाँच केले आहेत. BSNL चे हे नवीन प्लॅन 1,198 आणि 439 रुपयांचे आहेत. कंपनीने देशभरातील वापरकर्त्यांसाठी हे प्लॅन्स आणले आहेत, परंतु अद्याप हे सर्व वापरकर्त्यांसाठी आणले गेले नाही. हे प्लॅन्स 365 दिवसांपर्यंत वैधतेसह अनेक जबरदस्त बेनिफिट्स देतात.
हे सुद्धा वाचा : Whatsapp ची सेवा झाली होती ठप्प, जाणून घ्या अचानक का कमी होते Whatsappची सर्व्हिस…
BSNL च्या 1,198 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
कंपनीचा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. 1198 रुपयांच्या या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले हे फायदे दर 30 दिवसांनी आपोआप रिन्यू केले जातात. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दरमहा 3GB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी कॉलिंगसाठी 300 मिनिटे देखील देत आहे. याशिवाय BSNL च्या या लेटेस्ट प्लॅनमध्ये तुम्हाला 30 फ्री SMS ही मिळतील.
439 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
कंपनीचा हा प्लॅन अशा यूजर्ससाठी सर्वोत्तम आहे, ज्यांना डेटापेक्षा जास्त कॉलिंगची गरज असते. हा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 300 SMS मोफत मिळतील. मात्र, हा प्लॅन कोणत्याही इंटरनेट डेटाशिवाय येतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile