BSNL ने फक्त Rs 19 मध्ये सादर केला आपला नवीन रेट कटर प्लान, आता वॉयस कॉलिंग मध्ये तुम्हाला होईल हा मोठा फायदा. चला जाणून घेऊया तुम्हाला काय मिळत आहे ते.
BSNL ने एक नवीन प्रमोशनल प्लान लॉन्च केला आहे, याची किंमत फक्त Rs 19 आहे, हा प्लान कॉलिंग रेट्स मध्ये डिस्काउंट देण्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे. हा प्लान ने कंपनी ने फक्त तमिळनाडू आणि चेन्नई सर्कल्स मध्ये लॉन्च केला आहे. पण असे वाटते आहे की येत्या काळात हा संपूर्ण भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.
या प्लान च्या वैधते बद्दल बोलायचे तर ही 54 दिवस आहे. याचा अर्थ असा की तुम्ही दीर्घकाळ कमी किंमतीत वॉयस कॉल करू शकता, पण हा प्लान मुंबई आणि दिल्ली सर्कल मध्ये चालणार नाही.
वर सांगितल्याप्रमाणे हा प्लान काही निवडक सर्कल्स साठी लॉन्च करण्यात आला आहे, पण लवकरच हा देशभर लॉन्च केला जाणार असल्याचे बोलेल जात आहे. विशेष म्हणजे हा प्लान 11 ऑक्टोबरला एक्सपायर पण होणार आहे.
या प्लान बद्दल बोलायचे तर हा प्लान घेतल्यानंतर यात तुम्हाला ऑन-नेट वॉयस कॉलिंग फक्त 15 पैसे प्रति मिनिट या दराने मिळेल, तसेच ऑफ-नेट कॉलिंग तुम्हाला 35 पैसे प्रति मिनिट या दराने मिळेल. हा दर 54 दिवस वैध असेल.