BSNL पण रिलायंस जियो च्या वाटेवर, आता आली आहे या यादीत
BSNL पण आता त्या यादीत सामील झाली आहे, ज्यात रिलायंस जियो आधी पासून आहे. आता रिलायंस जियो प्रमाणे BSNL पण Rs 20 च्या आत तुम्हाला 2GB डेली डेटा देत आहे.
गेल्या काही दिवसांपासून BSNL खाजगी टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भरपुर नवीन टॅरिफ प्लान्स लॉन्च करत आहे आणि सतत असे करत आहे. आता पर्यंत जिथे फक्त रिलायंस जियो होती, तिथे आता BSNL ने पण पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे आता पर्यंत फक्त रिलायंस जियो तुम्हाला Rs 200 मध्ये 2GB डेली डेटा देत होती. पण आता BSNL ने या लिस्ट मध्ये स्वतःला समाविष्ट केले आहे. त्यासाठी कंपनी ने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आपला Rs 171 मध्ये येणारा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे.
जियो ला टक्कर
असे वाटते आहे की BSNL ने तर या लिस्ट मध्ये रिलायंस जियो ला पण मागे टाकले आहे. कारण रिलायंस जियो एवढाच डेटा तुम्हाला Rs 198 मध्ये देत आहे, जो BSNL तुम्हाला फक्त Rs 171 मध्ये देणार आहे. त्याचबरोबर या प्लानची वैधता जवळपास 30 दिवसांची आहे, पण जियो आणि अन्य टेलीकॉम कंपन्या आपल्या अशा प्लान्सची वैधता फक्त 28 दिवस ठेवतात.
BSNL चा नवीन प्लान
BSNL ने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आपला Rs 171 मध्ये येणारा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. पण हीच या प्लानची कमजोरी आहे, कारण रिलायंस जियो ने त्यांचा Rs 198 वाला प्लान संपूर्ण देशात उपलब्ध केला आहे.
या प्लान मध्ये तुम्हाला रोज 2GB डेटा संपूर्ण 30 दिवसांसाठी मिळत आहे, याचा अर्थ असा की तुम्हाला एकूण 60GB डेटा या प्लान मध्ये मिळेल. सोबतच तुम्हाला 100 SMS प्रतिदिन या हिशोबाने मिळतील. तसेच प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग पण कोणत्याही FUP लिमिट विना मिळत आहे.