जर BSNL बद्दल बोलायचे झाले तर ब्रॉडबँड सेगमेंट मध्ये ही सर्वात पुढे आणि सर्वात चांगली टेलीकॉम कंपनी म्हणून ओळखली जाते. सर्वात मोठ्या वायर्ड ब्रॉडबँड नेटवर्क ने आता आपले चार नवीन नॉन-FTTH प्लान्स ची घोषणा केली आहे, याची सुरवात Rs 99 पासून होते आणि यांची सर्वात मोठी खासियत ही आहे की हे डेली डाटा फायद्यांसह लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच टेलीकॉम कंपन्यांकडून आजकाल अनेक अनलिमिटेड प्रीपेड कॉम्बो पण लॉन्च करण्यात आले आहेत.
BSNL ने जे चार प्लान लॉन्च केले आहेत, त्यांची सुरवाती किंमत Rs 99 आहे, याव्यतिरिक्त दुसरा प्लान Rs 199, तिसरा प्लान Rs 299 आणि शेवटचा प्लान Rs 399 BBG ULD Combo ब्रॉडबँड च्या प्लान च्या रुपात लॉन्च केला गेला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला 45GB पासून 600GB पर्यंतचा डाटा लाभ मिळणार आहे. तसेच या चारही प्लान्स तुम्हाला 20Mbps डाटा स्पीड सह मिळत आहेत आणि FUP लिमिट पूर्ण झाल्यावर हा स्पीड 1Mbps होतो.
या प्लान मध्ये तुम्हाला फक्त डाटा मिळत नाही, तर कंपनी कडून तुम्हाला या सर्व प्लान्स सोबत अनलिमिटेड वॉयस कॉलिंग ची ऑफर पण मिळत आहे, जे तुम्ही कोणत्याही नेटवर्क वर वापरू शकता. याव्यतिरिक्त हे पण बघण्यालायक बाब ही आहे की हे प्लान्स पॅन-इंडिया आधारावर लॉन्च करण्यात आले आहेत. पण या प्लान्स ची वैधता यांच्या लॉन्च पासून फक्त 90 दिवसांची आहे. तसेच कंपनी कडून सांगण्यात आले आहे की अंदमान आणि निकोबार सर्कल मध्ये हे प्लान लागू होणार नाहीत. खाली या प्लान्स ची सविस्तर माहिती दिली आहे.
BSNL BBG Combo ULD 45GB प्लान
सर्वात आधी सर्वात छोट्या प्लान बद्दल बोलू. हा प्लान तुम्हाला फक्त Rs 99 मध्ये मिळत आहे, तसेच यात तुम्हाला 1.5GB डाटा 20Mbps च्या स्पीड ने मिळेल, तसेच तुमची FUP लिमिट संपल्यास तुमचा हा स्पीड 1Mbps होतो.
BSNL BBG Combo ULD 150GB प्लान
या लिस्ट मध्ये दुसरा प्लान हा आहे. याची किंमत Rs 199 आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 150GB डाटा मिळत आहे, जो 5GB डाटा प्रतिदिन आणि 20Mbps च्या स्पीड मध्ये अशा रुपात दिला जातो, तसेच डेली लिमिट पूर्ण झाल्यास हा स्पीड फक्त 1Mbps होतो.
BSNL BBG Combo ULD 300GB आणि 600GB प्लान्स
या लिस्ट मध्ये शेवटाचे प्लान 300GB आणि 600GB च्या लिमिट सह येतात आणि याची किंमत क्रमश: 299 आणि Rs 399 आहे. या प्लान्स चा स्पीड पण तेवढाच आहे पण यात तुम्हाला क्रमश: 10GB आणि 20GB डाटा प्रतिदिन मिळतो.