BSNL ने चार नवीन प्लान्स लॉन्च केले आहेत, यात Rs 99, Rs 199, Rs 229, आणि Rs 399 वाले प्लान्स आहेत. BSNL च्या या प्लान्स मध्ये तुम्हाला 600GB पर्यंत प्रति महिना डेटा लाभ मिळत आहेत.
जियो गीगाफाइबर साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, याचा अर्थ असा की गीगाफाइबर लवकरच लॉन्च होणार आहे, ही सेवा लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. जरी या सेवेच्या लॉन्च साठी काही दिवस असतानाही BSNL ने आता पासूनच कंबर कसायला सुरवात केली आहे. त्यासाठी BSNL ने आपले काही नवीन डेली लिमिट वाले ब्रॉडबँड प्लान फक्त Rs 99 च्या बेस किंमतीत लॉन्च केले आहेत.
BSNL ने चार नवीन प्लान्स लॉन्च केले आहेत, यात Rs 99, Rs 199, Rs 229, आणि Rs 399 वाले प्लान्स आहेत. BSNL च्या या प्लान्स मध्ये तुम्हाला 600GB पर्यंत प्रति महिना डेटा लाभ मिळत आहेत.
BSNL च्या या प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ने या प्लान्सची FUP लिमिट 1GB ठेवली आहे, तसेच तुम्हाला 20Mbps चा स्पीड मिळत आहे. साहजिकच तुम्हाला Rs 99 वाल्या प्लान मध्ये सर्वात कमी फायदे मिळत आहेत. तसेच Rs 399 वाल्या प्लान मध्ये तुम्हाला सर्वात जास्त आणि चांगली FUP लिमिट मिळत आहे.
त्याचबरोबर या प्लान्स मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स मिळत आहेत. पण लक्षात घ्या की BSNL चे हे प्लान्स तुम्हाला प्रमोशनल प्लान्स म्हणून देण्यात आले आहेत, याचा अर्थ असा की हे फक्त 90 दिवसांनी एक्सपायर होणार आहेत. तसेच जर तुम्ही अंदमान आणि निकोबार टेलीकॉम सर्कल मध्ये राहत असाल तर, हे प्लान्स तुमच्यासाठी नाहीत.