BSNL New Plan 2025: नववर्षाचे स्वागत करताना कंपनीने लाँच केले दोन नवीन प्लॅन्स, स्वस्तात दररोज 3GB पर्यंत डेटा
BSNL ने नवीन वर्षाच्या आधी ग्राहकांसाठी दोन नवीन प्लॅन्स लाँच केले.
BSNL ने एक प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह सादर केला आहे.
तर, दुसरा नवा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह कमी किमतीत लाँच केला आहे.
BSNL New Plan 2025: भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम ऑपरेटर भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने नवीन वर्षाच्या आधी आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनीने दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅन्ससह कंपनी तुम्हाला कमी किमतीत दैनंदिन भरपूर डेटा देणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, कंपनीने सादर केलेल्या दोन नवीन प्लॅन्सची किंमत आणि सविस्तर तपशील-
रिपोर्टनुसार, BSNL ने एक प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह सादर केला आहे, तर दुसरा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो, जो जास्त डेटा आणि दीर्घकालीन वैधता असलेल्या वापरकर्त्यांसाठी योग्य आहे. BSNL च्या नव्या प्लॅन्सची किंमत अनुक्रमे 215 आणि 628 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
BSNL चा 215 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या नव्या 215 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण एक महिना म्हणजेच 30 दिवसांची वैधता आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा दिला जातो. तसेच, या प्लॅनअंतर्गत सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगशिवाय, दररोज 100SMS पाठविण्याची सुविधा आहे. इतर बेनिफिट्समध्ये, हा प्लॅन हार्डी गेम्स, चॅलेंजर अरेना गेम्स, गेमऑन, ॲस्ट्रोसेल, गेमियम, लिस्टन पॉडकास्ट, झिंग म्युझिक, वॉव एंटरटेनमेंट आणि BSNL ट्यून्स ऍक्सेस यासारखे काही अतिरिक्त फायदे मिळतात.
BSNL चा 628 रुपयांचा प्लॅन
BSNL चा 628 रुपयांचा प्लॅन दीर्घकालीन वैधतेसह येतो, ज्याची वैधता 84 दिवस म्हणजेच जवळपास तीन महिन्यांची आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, 3GB दैनंदिन डेटाचा लाभ मिळेल. त्याबरोबरच, यात दररोज 100 SMS आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा पर्याय देखील आहे. हार्डी गेम्स, चॅलेंजर एरिना गेम्स, गेमऑन आणि ॲस्ट्रोसेल यांसारख्या सुविधाही या प्लॅनमध्ये पुरवल्या जात आहेत.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे दोन्ही प्लॅन्स भारतातील सर्व मंडळांमध्ये उपलब्ध आहेत. रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile