BSNL ने लॉन्च केला आपला नवीन प्रीपेड प्लान Rs 1,312 मध्ये 365 दिवसांची वैधता आणि दिला जात आहे 5GB डेटा.
बीएसएनएल ने आपला एक नवीन प्लान लॉन्च केला आहे, हा प्लान कंपनी ने एक वर्षाच्या दीर्घ वैधतेसह लॉन्च केला आहे. हा प्लान Rs 1,312 मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि याची वैधता 365 दिवस आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये पण कंपनी ने एक वर्षाची दीर्घ वैधता असणारे प्लान्स लॉन्च केले होते. या प्लान्स मध्ये Rs 1,699 आणि Rs 2,099 वाल्या प्लानचा समावेश होता. जर आपण आधीच्या प्लान्स सोबत या नवीन प्लानची तुलना केली तर या नवीन प्लान मध्ये तुम्हाला जास्त गोष्टी मिळत आहेत. हा प्लान जास्त अधिक अफोर्डेबल आहे असे म्हणता येईल.
BSNL चा RS 1,312 मध्ये येणार प्लान
वर सांगितल्याप्रमाणे हा नवीन प्लान तुम्हाला 365 दिवसांच्या वैधता सह मिळत आहे. याचा अर्थ असा कि हा प्लान एकदा घेतलाकि एका वर्षासाठी तुम्हाला तुमच्या रिचार्ज बद्दल कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागणार नाही.
या प्लान अंतर्गत तुम्हाला 24 तासांची फ्री लोकल आणि STD कॉलिंग रोमिंग इत्यादी सह करण्याची चांगली संधी मिळत आहे, याचा अर्थ असा कि तुम्हाला या प्लान मध्ये कॉलिंगसाठी कोणतीही अडचण येणार नाही. पण या प्लान मध्ये पण कॉलिंगचा लाभ तुम्ही दिल्ली आणि मुंबई सर्कल्स मध्ये घेऊ शकत नाही. या प्लान मध्ये संपूर्ण वैधतेसाठी तुम्हाला फक्त 5GB डेटा मिळत आहे. या प्लान मध्ये असलेल्या कमी डेटा मुले कदाचित तुम्हाला हा प्लान आवडणार नाही.
पण या प्लान मध्ये मिळणाऱ्या ऑफर इथेच संपत नाहीत. या प्लान मध्ये तुम्हाला 1000 SMS पण मिळत आहेत. तसेच यूजर्सना हॅलो ट्यून्सचा लाभ पण मिळणार आहे. याचा अर्थ असा कि तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी हॅलो ट्यून्सचा लाभ पण मिळत आहे. पण यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला हा प्लान सध्या तर फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सर्कल्स मध्ये मिळत आहे.