प्रतिदिन 40GB डेटा सह BSNL ने नवा ब्रॉडबँड प्लान केला सादर

Updated on 11-Feb-2019
HIGHLIGHTS

BSNL च्या या ब्रॉडबँड प्लान मध्ये युजर्सना प्रतिदिन 40GB चा फायदा मिळेल आणि याचा स्पीड 100Mbps असेल. डेटा लिमिट संपताच इन्टरनेट स्पीड 2Mbps होईल.

भारत संचार निगम लिमिटेड ने नवीन ब्रॉडबँड प्लान सादर केला आहे ज्याची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 100Mbps च्या स्पीडने 40GB डेटा मिळेल. नवीन BSNL ब्रॉडबँड प्लान "40GB Plan" नावाने ओळखला जात आहे आणि आता निवडक टेलिकॉम सर्कल मधेच हा प्लान उपलब्ध आहे. जे युजर्स एनुअल बेसिस वर हा लेटेस्ट प्लान घेतील त्यांना काही कॅशबॅक दिला जात आहे. तसेच 2,499 रुपयांच्या BSNL ब्रॉडबँड प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनेफिट्स आणि 1GB मेलबॉक्स स्पेस सोबत एक फ्री ईमेल ID चा एक्सेस पण मिळतो. या प्लानची वैधता 1 महिन्याची आहे.

BSNL च्या चेन्नईच्या वेबसाइट लिस्टिंग मध्ये Rs. 2,499 चा ब्रॉडबँड प्लान सर्व युजर्ससाठी 100Mbps स्पीड वर प्रतिदिन 40GB डेटा सह लिस्टेड आहे. 40GB लिमिट संपल्यावर कस्टमर्सना 2Mbps चा स्पीड मिळेल. प्लान अंतर्गत युजर्स देशात कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड वॉयस कॉल्स करू शकतील.

BSNL ने सध्या आपल्या ब्रॉडबँड प्लान्स वर 25% कॅशबॅक स्कीम सादर करत आहे. या स्कीम अंतर्गत जे युजर्स सहा महिने किंवा बारा महिन्यांसाठी एक BSNL ब्रॉडबँड प्लान निवडतात त्यांना एकीं किंमतीवर 25% कॅशबॅक मिळेल. कॅशबॅक साठी कोणतीही अधिकतम लिमिट पण ठेवण्यात आलेली नाही. याचा अर्थ असा कि जर एखाद्या युजरने सहा महिन्यासाठी Rs 2,499 चा ब्रॉडबँड प्लान निवडला तर त्यांना Rs 3,700 चा कॅशबॅक मिळेल आणि 12 महिन्याचा हा प्लान निवडल्यास Rs 7,400 चा कॅशबॅक मिळेल.

BSNL च्या या प्लान मध्ये युजर्सना डेटा बेनिफिट सोबत अनलिमिटेड कॉल्स पण मिळत आहेत जी या प्लानची खासियत आहे. हा प्लान 1 फेब्रुवारी पासून लागू झाला आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :