BSNL ने रिलायंस JioGigaFiber ला टक्कर देण्यासाठी सादर केला आपला Rs 995 वाला ब्रॉडबँड प्लान
येत्या काही दिवसात JioGigaFiber सेवा कंपनी सादर करणार आहे, पण या लॉन्च च्या आधी या सेवेला टक्कर देण्यासाठी BSNL ने आपल्या ब्रॉडबँड प्लान्सला अपडेट करायाला सुरवात केली आहे.
रिलायंस JioGigaFiber च्या लॉन्च च्या आधीच BSNL ने आपले नवीन ब्रॉडबँड प्लान सादर केले आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे की येत्या काही दिवसात रिलायंस जियो JioGigaFiber सेवा लॉन्च करणार आहे. पण त्या आधीच बीएसएनएल ने आपला अजून एक नवीन ब्रॉडबँड प्लान लॉन्च केला आहे.
हा नवीन बीएसएनएल Fibro BBG ULD 995 वाला प्लान फक्त 995 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला दोनशे GB FUP डेटा मिळणार आहे. हा डेटा तुम्हाला 20 एमबीपीएस सह मिळेल. पण जर याची तुलना ACT ब्रॉडबँड शी केल्यास हा एवढा खास नाही, जेवढा आपल्याला वाटतो. तसेच भारती एयरटेल पण अनेक बाबतीत पुढे आहे. बीएसएनएल बद्दल बोलायचे तर FUP लिमिट संपताच तुम्हाला दोन एमबीपीएस चा स्पीड मिळेल.
काही दिवसांपूर्वी BSNL चा नवीन प्लान बाजारात आला होता, या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड रोमिंग, लोकल आणि STD कॉलिंग मिळत आहे. पण हा पॅक दिल्ली आणि मुंबई सर्कल्स मधून हटवण्यात आला आहे. सोबतच या प्लान मध्ये तुम्हाला 2GB डेटा रोज मिळत आहे, याचा अर्थ असा की 30 दिवसात 60GB डेटा मिळत आहे. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये तुम्हाला रोज 100 SMS मिळत आहेत, तसेच कॉलिंग बद्दल बोलायचे तर यात कोणतीही FUP लिमिट नाही.
रिलायंस जियो चा Rs 198 मध्ये येणारा प्लान पाहता या प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवस 2GB डाटा प्रतिदिन, आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबत 100 SMS प्रतिदिन पण मिळत आहेत. असाच एक प्लान भारती एयरटेल कडे पण आहे, परंतु त्याची किंमत Rs 199 आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवस 1.4GB डेटा आणि इतर सुविधा तशाच मिळत आहेत जशा आपण बाकीच्या दोन प्लान्स मध्ये बघितल्या आहेत. हे पाहून असे बोलू शकतो की BSNL या दोन्ही कंपन्यांच्या पुढे आहे.