BSNL ने आपला एक नवीन प्लान Rs 96 मध्ये सादर केला आहे. विशेष म्हणजे या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सोबतच 100 SMS पण मिळत आहेत आणि या प्लानची वैधता एकूण 180 दिवसांची आहे. सध्यातरी हा प्लान फक्त चेन्नई आणि तामिळनाडू सर्कल्स मध्ये वैध आहे.
वर सांगितल्याप्रमाणे या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 100 SMS पण मिळत आहेत. जरी या प्लान मध्ये तुम्हाला 100 SMS मिळत असले तरी ते काही एका दिवसासाठी नाहीत तर ते संपूर्ण वैधतेसाठी मिळत आहेत. म्हणजे हे तुम्हाला जवळपास 21 दिवसांसाठी मिळत आहेत. याचा अर्थ असा की तुम्हाला प्रतिदिन 21 दिवसांसाठी या प्लान 100 SMS पण मिळणार आहेत. तसेच हा प्लान तुम्हाला एका प्रमोशनल पीरियड अंतर्गत जवळपास 90 दिवसांसाठी मिळत आहे, हा 5 जुलै पासून लागू झाला आहे.
लिस्टिंग बद्दल बोलायचे झाले तर BSNL द्वारा सादर करण्यात आलेला हा Rs 96 मध्ये येणारा Prepaid Recharge Plan सध्या फक्त तामिळनाडू आणि चेन्नई सर्कल्स मध्ये वैध आहे. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्स मिळत आहेत. तसेच तुम्ही दिल्ली आणि मुंबई सोडून कोणत्याही दुसर्या सर्कल मध्ये या प्लानच्या माध्यमातून रोमिंगचा लाभ पण घेऊ शकता.
विशेष म्हणजे अलीकडेच BSNL ने त्यांच्या Bumper Offer ची मुदत वाढवली आहे, हा प्लान ऑक्टोबर पर्यंत वैध असेल. यात तुम्हाला 2.2GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला इतकाच डेटा रोज मिळत आहे. ही ऑफर तुम्हाला काही निवडक प्रीपेड प्लान्स सोबत मिळणार आहे. तसेच या टेलीकॉम कंपनीने त्यांचे Rs 186 आणि Rs 187 मध्ये येणारे की प्लान पण अपग्रेड केले आहे. आता या रिचार्ज प्लान्स मध्ये तुम्हाला 2GB डेटा प्रतिदिन मिळत आहे.