BSNL चा नवीन धमाका: BSNL ने आपल्या यूजर्स साठी सादर केली नवीन सेवा, या लोकांना होईल सर्वात जास्त फायदा
BSNL च्या या नव्या सेवे अंतर्गत तुम्ही वॉयस कॉलिंग च्या किंमतीत विडियो कॉलिंग चा लाभ घेऊ शकाल, खाली जाणून घ्या कसा घ्याल याचा फायदा
तुमच्या लक्षात असेल की मागच्या वर्षी BSNL ने आपली एक अॅप आधारित सेवा लॉन्च केली होती, जी आपण Limited Fixed Mobile Telephony (LFMT) च्या नावाने ओळखतो. या सेवेचा सर्वात मुख्य फायदा हा आहे की तुम्ही हिच्या माध्यमातून BSNL च्या या सेवेवर कोणत्याही दुसर्या यूजर्स सोबत फ्री मध्ये वॉयस कॉलिंग चा लाभ घेऊ शकता. पण आता या सेवेमध्ये विडियो कॉलिंग पण समाविष्ट करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता BSNL यूजर्स ऑडियो कॉल च्या किंमतीत विडियो कॉल चा आनंद घेऊ शकतील. पण अजून ही सेवा सर्व BSNL यूजर्स साठी लागू करण्यात आली नाही, ही फक्त BSNL च्या ब्रॉडबँड यूजर्स साठी सध्यातरी उपलब्ध आहे.
पण या सेवेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक छोटीसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करताच तुम्ही या सेवेचा फायदा घेऊ शकाल. यासाठी तुम्हाला कंपनी च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागले, जी ngn.bsnl.co.in आहे, लक्षात असू द्या कि तुमच्या जवळ तुमचे अकाउंट डिटेल्स पण असणे गरजेचे आहे. या नंतर या पोर्टल मध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाइल नंबर चा वापर करावा लागेल ज्यावर तुम्हाला ही सेवा वापरायची आहे. तो इथे सबमिट करावा लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या फोन मध्ये एक अॅप आवश्यक आहे, ज्याचे Grandstream Wave नाव आहे. हा अॅप तुमच्या फोन मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक अकाउंट सेटअप करावा लागेल. यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकाल. असेच काहीसे तुम्हाला वॉयस कॉलिंग साठी पण करावे लागत होते आणि आता त्याच प्रोसेस ला फॉलो करून तुम्ही LFMT सेवा च्या माध्यमातून विडियो कॉलिंग चा फायदा घेऊ शकता.
कालच समोर आले होते की आपल्या स्टॅण्डर्ड ब्रॉडबँड प्लान्स सह BSNL आता आपल्या FTTH ब्रॉडबँड प्लान्स चा स्पीड 100Mbps पर्यंत वाढवू शकते. तसेच आता कंपनी ने आपल्या Rs 4,999 च्या किंमतीत येणार्या ब्रॉडबँड प्लान मध्ये काही बदल केले आहेत, त्यात तुम्हाला डेटा वाढवून मिळत आहे. आता या प्लान मध्ये तुम्हाला 100Mbps चा स्पीड मिळत आहे, सोबतच याची FUP प्रतिमाह 1500GB असेल. पण हा बदल फक्त चेन्नई रीजन मध्येच बघायला मिळेल.
त्याचबरोबर आता यूजर्सना जवळपास 2Mbps चा स्पीड मिळणार आहे, जो तुम्हाला सोशल मीडिया आणि अन्य काही काम करण्यासाठी पूरे आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला डेटा चे पण चांगले ऑप्शन मिळणार आहेत. तसेच BSNL कडून यूजर्सना एक फ्री ईमेल ID पण मिळणार आहे, ज्यात 5MB फ्री स्पेस मिळेल. तसेच कंपनी कडून तुम्हाला एक फ्री IP एड्रेस पण मिळणार आहे.