भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने दोन नवीन मासिक प्री-पेड प्लॅन्स लाँच केले आहेत. यापैकी एक प्लॅन 228 रुपयांचा आहे. BSNLच्या या 228 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2 GB डेटा मिळेल. दुसरा प्लॅन 239 रुपयांचा आहे, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंगशिवाय 10 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळेल. BSNL चे हे दोन्ही प्लॅन आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून उपलब्ध होतील.
हे सुद्धा वाचा : OnePlus चे सर्वात स्वस्त इअरबड्स, प्रत्येकाच्या बजेटमधील किंमत, जाणून घ्या डिटेल्स
टेलिकॉमने सर्वप्रथम BSNL च्या या प्लॅनची माहिती दिली आहे. BSNL च्या या दोन्ही प्लॅनसह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत. 228 रुपयांच्या प्लॅनसह Arena मोबाइल गेमिंगचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. BSNLच्या या दोन्ही प्लॅनची वैधता एका महिन्याची आहे.
VI कडेही असे प्लॅन्स आहेत. Vi च्या 239 रुपये आणि 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील मासिक वैधता उपलब्ध आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि अनुक्रमे 1 GB आणि 1.5 GB डेटा प्रतिदिन उपलब्ध आहे. 249 रुपयांच्या प्लॅनची वैधता 24 दिवस आणि 239 रुपयांच्या प्लॅनची वैधता 21 दिवसांची आहे.
Airtelकडे 239 रुपयांचा प्री-पेड प्लॅन आहे, जो अमर्यादित कॉलिंगसह दररोज 1 GB डेटा आणि 24 दिवसांची वैधता ऑफर करतो. Jioचा 222 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा मिळतो. तसेच, एक 222 रुपयांचा प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये दररोज 2 GB डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.