BSNL ने आपल्या मोबाईल फेस्टिवल ऑफर अंतर्गत Rs 252 आणि Rs 402 च्या प्लान मध्ये अतिरिक्त टॉक टाइम देत आहे आणि हि ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Rs 252 आणि Rs 402 च्या प्लान्स मध्ये मिळत आहे अतिरिक्त टॉक टाइम
आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सर्कल मध्ये उपलब्ध आहे ऑफर
Rs 252 च्या प्लान मध्ये मिळत आहे Rs 350 चा टॉक टाइम
BSNL आपल्या Rs 252 च्या प्रीपेड प्लान वर 66% अतिरिक्त टॉक टाइम देत आहे. त्याचबरोबर कंपनी Rs 402 च्या प्रीपेड प्लान मध्ये पण अतिरिक्त टॉक टाइम ऑफर करत आहे. Rs 252 च्या प्लान मध्ये नेहमी Rs 210 चा टॉक टाइम मिळतो पण आता या प्लान मध्ये युजर्सना Rs 350 चा टॉक टाइम मिळतो. तसेच, प्लान मध्ये 2GB 2G/3G डेटा लाभ पण मिळत आहे. Rs 402 च्या प्लान मध्ये Rs 600 चा टॉक टाइम आणि 4GB डेटा मिळत आहे. हि ऑफर 21 जानेवारी 2019 पर्यंत मान्य आहे. पण हि ऑफर BSNL च्या आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सर्कल मध्ये उपलब्ध आहे.
BSNL आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सर्कल मध्ये आपल्या सब्सक्राइबर्सना टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून माहिती देत आहे. BSNL ने या ऑफरला ‘मोबाईल फेस्टिवल ऑफर’ नाव दिले आहे आणि हि 21 जानेवारी 2019 पर्यंत वैध आहे. BSNL चे Rs 252 आणि Rs 402 चे दोन कॉम्बो STVs उपलब्ध आहेत जे टॉक टाइम आणि डेटा बेनिफिट देतात. या ऑफर अंतर्गत आता Rs 252 च्या प्लान मध्ये Rs 350 चा टॉक टाइम मिळत आहे जो आधीच्या बेनिफिटच्या तुलनेत 66% जास्त आहे. लक्षात ठवण्याची बाब म्हणजे टॉक टाइम बेनिफिटची वैधता फक्त 30 दिवस आहे तर डेटा बेनिफिटचा लाभ 60 दिवस घेतला जाऊ शकतो.
Rs 402 चा प्रीपेड रिचार्ज 4GB 2G/3G डेटा सह येतो जो 60 दिवसांसाठी वैध आहे तसेच प्लान मध्ये 30 दिवसांसाठी Rs 600 चा टॉक टाइम मिळत आहे. हि ऑफर 1 जानेवारी 2019 पर्यंतच मान्य आहे. सध्यातरी हि मोबाईल फेस्टिवल ऑफर फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सर्कल मध्ये उपलब्ध आहे.