BSNL ने सादर केला 1,099 रुपयांमध्ये नवीन ‘KOOL’ प्रीपेड रिचार्ज, 84 दिवसांसाठी मिळणार अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंग ची सुविधा

BSNL ने सादर केला 1,099 रुपयांमध्ये नवीन ‘KOOL’ प्रीपेड रिचार्ज, 84 दिवसांसाठी मिळणार अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंग ची सुविधा
HIGHLIGHTS

नवीन प्रीपेड प्लॅन सर्व BSNL सर्कलस मध्ये उपलब्ध आहे आणि अनलिमिटेड वॉयस कॉल आणि डेटा देणारा हा प्लॅन आहे.

BSNL ने आपल्या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान 'KOOL'  ला 1,099 रुपयांच्या किंमतीवर लाँच केले आहे. हा बिना FUP अनलिमिटेड डेटा देतो, सोबत फ्री लोकल आणि एसटीडी कॉलिंग ची सुविधा पण आहे. या प्लॅन ची वैलिडिटी 84 दीवासांची आहे आणि दररोज100 फ्री एसएमएस पण मिळत आहेत. 

BSNL बोर्ड चे डायरेक्टर आर.के. मित्तल ने सांगितले की, आम्ही ग्राहकांना स्वस्त आणि उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. बीएसएनएल ने सर्वांसाठी उपयुक्त 1,099 रूपयांची KOOL ऑफर सादर केली आहे. ही ऑफर संपूर्ण भारतात उपलब्ध होईल.

BSNL भारतभर 3G स्पेक्ट्रम वर चालत आहे, पण या दूरसंचार कंपनी ने केरल मध्ये काही दिवसांपूर्वी आपली 4G सर्विस सुरू केली आहे. ही सर्विस सध्यातरी इदुक्की मध्ये 5 जागी उपलब्ध आहे आणि कंपनी लवकरच केरल च्या दुसर्‍या क्षेत्रांमध्ये एक्सपांड करेल. 4G सर्विसेस कंपनी च्या 3G स्पेकट्रम वर आधारित आहे. त्यामुळे यूजर्सना 3G सक्षम सिम कार्ड वर हाई स्पीड वाल्या 4G सेवांचा फायदा घेण्याची संधी मिळते. 

काही दिवसांपूर्वी, वोडाफोन ने VoLTE (वॉयस ओवर एलटीई) सेवा काही सर्किल मध्ये सुरू केली आहे. ही सेवा सध्यातरी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि गुजरात सर्किल्स मध्ये उपलब्ध आहे. 

रिलायंस जियो भारतात VoLTE सेवा लाँच करणारी पहिली कंपनी आहे, त्यानंतर एयरटेल. तर वोडाफोन देशात VoLTE सेवा देणारी तिसरी टेलीकॉम कंपनी आहे आणि कंपनी नुसार त्यांचे सुपरनेट 4G ग्राहक मोफत VoLTE मध्ये अपग्रेड करू शकतात. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo