BSNL ने आपल्या पोस्टपेड यूजर्स साठी अॅड-ऑन प्लान्स आणले आहेत. हे प्लान्स लिमिटेड आणि अनलिमिटेड डेटा अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत आणि हे चालू असलेला प्लान संपताच एक्टिवेट होतील. जर एखाद्या यूजरला वाटत असेल की त्याचे प्राइमरी प्लान्स त्याला पुरणार नाहीत तर यूजर हे प्लान्स महिन्यातून तीनदा वापरू शकतो. TelecomTalk च्या रिपोर्ट नुसार हे अॅड-ऑन पॅक 3G स्पीड देतील.
अनलिमिटेड अॅड-ऑन प्लान्स FUP लिमिट सोबत येतात ज्यात यूजर्सना हाई स्पीड इन्टरनेट वापरता येईल. FUP लिमिट संपताच डेटा स्पीड कमी होऊन प्लान नुसार कमी होईल. अनलिमिटेड प्लान 240 रुपयांपासून सुरू होतात, ज्यात यूजर्सना 3.5GB डेटा ची FUP लिमिट मिळते आणि ही FUP लिमिट पूर्ण होताच डेटा स्पीड कमी होऊन 80Kbps होईल. तसेच 340 रुपयांच्या प्लान मध्ये 5.5GB पर्यंत हाई-स्पीड इन्टरनेट वापरता येईल, या प्लान मध्ये पण FUP लिमिट संपताच स्पीड 80Kbps होतो.
जर तुम्हाला यापेक्षा जास्त डेटा ची आवश्यकता असेल तर 666 रुपयांचा अॅड-ऑन प्लान एक्टिवेट करू शकता जो 11GB डेटा देतो, याव्यतिरिक्त 901 आणि 1,711 रुपयांच्या प्लान्स मध्ये क्रमश: 20GB आणि 30GB चा हाई-स्पीड इन्टरनेट मिळतो. दोन्ही प्लान्स मध्ये FUP लिमिट पूर्ण झाल्यावर स्पीड कमी होऊन 128Kbps होतो.
लिमिटेड अॅड-ऑन प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर 50 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 550MB हाई-स्पीड डेटा मिळतो, पण FUP लिमिट पूर्ण झाल्यावर यूजर्सना 1p/10KB इतका चार्ज द्यावा लागेल. याव्यतिरिक्त 75 रुपयांच्या प्लान मध्ये 1,500MB डेटा मिळतो.