BSNL ने आपल्या यूजर्ससाठी खास Independence Day Offer आणली आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना 75 दिवसांची ब्रॉडबँड सेवा सामान्य दरापेक्षा खूपच कमी दरात मिळेल. BSNL ची ही ऑफर 75 दिवसांसाठी 275 रुपयांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देत आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. कंपनीची ही ऑफर 449 रुपये, 599 रुपये आणि 999 रुपयांच्या प्लॅनवर उपलब्ध आहे. जाणून घेऊयात सविस्तर…
हे सुद्धा वाचा : Realme कडून 15 ऑगस्टपर्यंत जोरदार ऑफर, 5G स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट
ऑफर अंतर्गत, कंपनी रु. 499 आणि 599 रुपयांचा प्लॅन 275 रुपयांमध्ये घेण्याची संधी देत आहे. 75 दिवसांनंतर तुम्हाला या प्लॅनसाठी नियमित दर भरावे लागतील. तसेच, 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन ऑफर अंतर्गत 775 रुपयांमध्ये सबस्क्राइब करता येईल. विशेष म्हणजे डिस्काउंटनंतरही कंपनीने या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये कोणताही बदल केलेला नाही.
कंपनी आपल्या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30Mbps इंटरनेट स्पीड देत आहे. तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 3300GB म्हणजेच 3.3TB डेटा मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2Mbps पर्यंत कमी होईल. त्याचप्रमाणे, कंपनी आपल्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 60Mbps स्पीडमध्ये 3.3TB डेटा देत आहे. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150Mbps च्या स्पीडने 2TB डेटा मिळेल. Disney + Hotstar आणि Sony Liv व्यतिरिक्त, तुम्हाला प्लॅनमधील इतर अनेक लोकप्रिय OTT ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
BSNL ने नुकताच आपला 2022 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीचा हा प्लॅन 300 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 75 GB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा पहिल्या 60 दिवसांसाठी वापरला जाऊ शकतो. या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 100 मोफत SMS देखील देत आहे. हा प्लॅन 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल.