BSNL युजर्सची मज्जाच मजा! कंपनीने स्वस्त आणि Popular प्लॅनच्या वैधतेत केली वाढ, वाचा सर्व डिटेल्स। Tech News 

BSNL युजर्सची मज्जाच मजा! कंपनीने स्वस्त आणि Popular प्लॅनच्या वैधतेत केली वाढ, वाचा सर्व डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

BSNL कडे 151 रुपयांचे डेटा व्हाउचर उपलब्ध आहे.

BSNL चा 151 रुपयांचा प्लॅनची वैधता वाढवण्यात आली आहे.

ज्या युजर्सना जास्त डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स समाविष्ट केले आहेत. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक डेटा व्हाउचर देखील उपलब्ध आहेत. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान कंपनीने 151 रुपयांचे डेटा व्हाउचर लाँच केले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे व्हाउचर विशेषत: घरून काम करणाऱ्या युजर्ससाठी सादर करण्यात आले होते. पूर्वी या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह भरपूर डेटा मिळत होता.

मात्र, लॉकडाऊननंतर कंपनीने 2022 मध्ये या प्लॅनची वैधता कमी करून 28 दिवसांची वैधता केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा सरकारी टेलिकॉम कंपनीने या प्लॅनची ​​वैधता वाढवली आहे. चला तर मग जाणून घेऊयात प्लॅनची नवी वैधता-

BSNL चा 151 रुपयांचा प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे, BSNL च्या 151 रुपयांचा प्लॅनची वैधता वाढवण्यात आली आहे. होय, आता पुन्हा एकदा कंपनीने त्याची वैधता वाढवली आहे, त्यानंतर तुम्हाला हा प्लॅन परत एकदा एकूण 30 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह 40GB डेटा प्रदान करतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये Zing चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. हा 40GB डेटा तुम्ही 30 दिवसांसाठी वापरू शकता.

BSNL PLANS
BSNL PLAN

जर तुम्ही दररोज भरपूर डेटा वापरत असाल तर BSNL चा हा प्लॅन तुमच्यासाठी आहे. लक्षात घ्या की, हा कंपनीचा फक्त डेटा पॅक आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला SMS आणि कॉलिंगचे फायदे मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला स्वतंत्र बेस प्लॅन घ्यावा लागेल. इतर बेस प्लॅनसह तुम्हाला दैनिक डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि SMS चे फायदे मिळणार आहेत.

BSNL 5G

5G सेवा लवकरच सरकारी दूरसंचार कंपनी BSNL द्वारे लाँच केली जाणार आहे, असे सांगितले जात आहे. जवळपास एक वर्षापूर्वी Jio आणि Airtel ने 5G सेवा सुरू केली होती. सध्या दोन्ही कंपन्या 5G सेवा मोफत प्रदान करत आहेत. ताज्या अहवालानुसार, BSNL 2024 मध्ये 4G सेवेचा जास्तीत जास्त विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. तर, BSNL 5G सेवा 2025 मध्ये सुरू होणार आहे, असे देखील लीक अहवालामध्ये समोर आले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo