BSNL ने बंद केला स्वस्त प्लॅन, आता कोणता आहे कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन ?

BSNL ने बंद केला स्वस्त प्लॅन, आता कोणता आहे कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन ?
HIGHLIGHTS

BSNL ने आपला 329 रुपयांचा प्लॅन बंद केला.

आता कंपनीकडे सर्वात स्वस्त प्लॅन 399 रुपयांचा आहे.

BSNL 31 मार्च 2023 पर्यंत मोफत Wi-Fi राउटर स्थापित करून देणार आहे.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपला सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन बंद केला आहे. BSNL चा 329 रुपयांचा प्लॅन आता बंद करण्यात आला आहे. BSNL च्या या प्लॅनमध्ये 20Mbps च्या स्पीडने 1TB पर्यंत डेटा उपलब्ध होता. आता हा प्लॅन BSNL च्या कोणत्याही सर्कलमध्ये उपलब्ध नाही. जुलै 2022 मध्ये, BSNL ने कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, उत्तराखंड आणि लक्षद्वीप UT या सहा मंडळांमध्ये हा प्लॅन सादर केला.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलचा शेवटचा दिवस, पहा आजचे बेस्ट डिल्स…

आता 'हा' आहे कंपनीचा स्वस्त प्लॅन 

BSNL ने आपला 329 रुपयांचा  प्लॅन बंद केला आहे. अशा परिस्थितीत आता ग्राहकांकडे सर्वात स्वस्त प्लॅन 399 रुपयांचा आहे. BSNL च्या या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडने 1TB इंटरनेट डेटा मिळेल. डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 4Mbps पर्यंत कमी होईल.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 449 रुपयांचा प्लॅन देखील घेऊ शकता. या प्लॅनमध्ये 3.3TB डेटा 30Mbps स्पीडवर मिळेल. तर, कंपनीचा 499 रुपयांचा प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये 40Mbps च्या वेगाने 3.3TB डेटा उपलब्ध आहे. तसे, तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की Jio आणि BSNL दोन्ही कंपन्यांचे 399 रुपयांचे प्लॅन आहेत. 

BSNL मध्ये मोफत Wi-Fi राउटर इन्स्टॉलेशन

BSNL 31 मार्च 2023 पर्यंत मोफत Wi-Fi राउटर स्थापित करून देणार आहे. BSNL भारत फायबर कनेक्शन घेणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला कनेक्शनसह मिळणारे राउटर सिंगल बँड असेल आणि तुम्हाला किमान सहा महिन्यांचा प्लॅन घ्यावा लागेल. जर तुम्हाला ड्युअल बँड राउटर हवा असेल तर तुम्हाला 12 महिन्यांचा प्लॅन घ्यावा लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo