BSNL ने आपल्या संडे फ्री वॉयस कॉलिंग मध्ये केले आहेत हे मोठे बदल, या यूजर्सना होईल सर्वात जास्त फायदा
BSNL च्या संडे वॉयस फ्री कॉलिंग बद्दल तर तुम्हाला माहीत असेलच, हा प्लान यूजर्स मध्ये प्रसिद्ध आहे.
BSNL च्या संडे वॉयस फ्री कॉलिंग बद्दल तर तुम्हाला माहीत असेलच, हा प्लान यूजर्स मध्ये प्रसिद्ध आहे. आता BSNL ने आपल्या या प्लान मध्ये काही बदल करण्याचा विचार केला आहे, या बदलांमुळे आता ब्रॉडबँड आणि लँडलाइन, कॉम्बो आणि FTTH ब्रॉडबँड प्लान्स वर याची वैधता वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की ही ऑफर आता कंपनी कडून खालील प्लान्स वर एक्सटेंड केली आहे.
हा प्लान संपूर्ण भारतात बदलण्यात आला आहे. याची माहिती कंपनी ने आपल्या एक प्रेस स्टेटमेंट मध्ये दिली आहे. कंपनी ने यात सांगितले आहे की हे बदल 1 मे पासून सुरू होतील. या प्लान ची वैधता वाढवण्या मागे कारण हे आहे की हे फेब्रुवारी मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि 30 एप्रिल ला याची अवधि समाप्त झाली आहे. पण आता ही सेवा पुढील सूचना मिळे पर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्लान अंतर्गत कंपनी ने जवळपास सर्व यूजर्स कोणत्याही इतर नेटवर्क वर रविवारी अनलिमिटेड फ्री कॉलिंग चा लाभ घेऊ शकतात.
जसे की आम्ही तुम्हाला सांगितले आहे की कंपनी ने अधिकृत पणे याची माहिती आपल्या एका प्रेस स्टेटमेंट ने दिली आहे, कंपनी ने सांगितले आहे की, “या अनलिमिटेड संडे फ्री कॉलिंग ची अवधि पुढील नोटिस येई पर्यंत 1 मे 2018 पासून वाढवण्यात आली आहे. याची अवधि 30 एप्रिलला संपली आहे. ”
पण या जबरदस्त सेवा वर कंपनी ने अचानक जानेवारी मध्ये बंद केली होती पण यूजर्स ची वाढत्या मागणी मुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. वाढती मागणी बघून कंपनी ने ही सेवा पुन्हा एकदा जानेवारी च्या शेवटा पासून तीन महिन्यांसाठी सुरू केली आहे. ज्याची अवधि 30 मे ला समाप्त होत आहे. पण आता ही सेवा पुढील नोटिस येई पर्यंत वाढवण्यात आली आहे.