BSNL Diwali Bonanza Offer: भारी मज्जा! तब्बल 70GB सह येणाऱ्या डेटा प्लॅनमध्ये मिळणार अतिरिक्त डेटा, OTT बेनिफिट्स उपलब्ध

Updated on 03-Nov-2023
HIGHLIGHTS

BSNL ने युजर्ससाठी दिवाळी ऑफर म्हणजेच BSNL Diwali Bonanza ऑफर आणली आहे.

BSNL च्या स्वस्त डेटा प्लॅनमध्ये ऑफर अंतर्गत अतिरिक्त डेटा मिळणार आहे.

या प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी OTT सबस्क्रिप्शनची सुविधाही मिळेल.

BSNL कंपनी स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. तथापि, सरकारी दूरसंचार कंपनी या स्वस्त प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनेक फायदे देखील प्रदान करते. आता सणासुदीच्या काळात सर्व कंपन्या स्वतःच्या उत्पादनांवर ऑफर्स घेऊन येतात. त्यात BSNL देखील मागे नाही. होय, कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी दिवाळी ऑफर म्हणजेच BSNL Diwali Bonanza ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी आपल्या स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन अंतर्गत अतिरिक्त डेटा देत आहे. तुम्हाला आणखी बेनिफिट्सदेखील मिळतील. जाणून घ्या सविस्तर-

BSNL चा 251 रुपयांचा प्लॅन

BSNLने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एका पोस्टद्वारे या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. ही BSNL ची Diwali Bonanza Offer आहे. BSNL प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 251 रुपये आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. दिवाळी बोनान्झा ऑफर अंतर्गत, कंपनी या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 3GB अतिरिक्त डेटा देत आहे.

BSNL चा 251 रुपयांचा प्लॅन एक डेटा प्लॅन होय. या प्लॅनमध्ये यूजर्सना 70GB डेटा मिळतो. आता 70GB डेटासोबत, BSNL च्या या प्लॅनमध्ये 3GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. त्यानुसार, हा प्लॅन तुम्हाला एकूण 73GB डेटाचा एक्सेस देतो. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी OTT सबस्क्रिप्शनची सुविधाही देण्यात आली आहे, ज्यामध्ये झिंगचा समावेश आहे.

या किमतीत इतर कंपन्यांचे प्लॅन्स

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel, Jio आणि Vodafone Idea कंपनी असा कोणताही प्लॅन घेऊन येत नाही. किंमत श्रेणी बघता, Jio कंपनी 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा ऑफर करते. तर, VI कंपनी 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1GB डेटा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, Airtel कडे 265 रुपयांच्या किंमतीत 28 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :