भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपंनी BSNL आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे स्वस्त आणि चांगले प्लॅन सादर करणार आहे. नुकतेच BSNL कंपनीने आपला लोगो आणि टॅगलाइन बदलली आहे. तसेच, खाजगी कंपन्यांनी केलेल्या टॅरिफ हाईकनंतर लोकांचा कल BSNL कंपनीकडे वाढत जात आहे. या रिपोर्टमध्ये आज आम्ही तुम्हाला BSNL च्या भरपूर डेटासह येणाऱ्या स्वस्त प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, ज्याची किंमत 60 रुपयांपेक्षा कमी आहे.
होय, BSNL कंपनी आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये 58 रुपयांचा मजबूत रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. या प्लॅनमध्ये दैनंदिन डेटा आणि वैधता यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. चला तर मग पाहुयात या प्लॅनमधील सर्व बेनिफिट्स-
कथित BSNL प्लॅनची किंमत फक्त 58 रुपये आहे. या प्लॅनमध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी 7 दिवसांची वैधता प्रदान करते. प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, BSNL च्या या स्वस्त प्लॅनमध्ये तुम्हाला 1 नव्हे तर दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. वैधतेदरम्यान तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 14GB डेटा मिळणार आहे. 7 दिवसांच्या वैधतेनुसार, हा प्लॅन तुम्हाला एकूण 14GB डेटामध्ये प्रवेश प्रदान करेल.
दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40kbps पर्यंत कमी होतो. लक्षात घ्या की, BSNL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि SMS सारखे फायदे मिळणार नाहीत. इतर फायद्यांसाठी तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता आहे. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.
नुकतेच BSNL ने आपला लोगो आणि टॅगलाइन बदलली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पूर्वी राखाडी वर्तुळात दिसणारा BSNL लोगो आता भगव्या रंगात बदलला आहे. तसेच, कनेक्टिंग इंडिया ऐवजी ‘कनेक्टिंग भारत’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. एवढेच नाही तर, BSNL ने नव्या अवतारासह 7 नव्या सर्व्हिसदेखील लाँच केल्या आहेत. या सर्व्हिसेसबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.