BSNL प्रीपेड प्लॅन व्यतिरिक्त, सरकारी टेलिकॉम कंपनी उत्कृष्ट ब्रॉडबँड प्लॅन्स देखील ऑफर करते. मोबाइल सेवेत BSNL जरी मागे असेल, तरीही फायबर ब्रॉडबँडमध्ये BSNL इतर कंपन्यांना टक्कर देत आहे. या लेखात आम्ही तुम्हाला BSNLच्या अशा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या स्पीडसह OTT फायदे देखील मिळतील.
BSNLची ब्रॉडबँड सर्व्हिस 'भारत फायबर' या नावाने ओळखली जाते. कंपनीचा 749 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100 Mbps स्पीड दिली जाते. यामध्ये तुम्हाला OTT फायदे देखील मिळतील. मात्र, ही योजना सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला चंदीगडमध्ये 749 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन मिळेल, परंतु तो छत्तीसगडमध्ये उपलब्ध नाही.
हे सुद्धा वाचा : उत्तम बॅटरी लाइफ आणि दमदार साउंडसह boatचे नवीन इअरबड्स लाँच, किंमत फक्त 1500 रुपये
कंपनीने या प्लॅनला सुपरस्टार प्रीमियम-1 असे नाव दिले आहे. प्लॅनमध्ये 100Mpbs च्या स्पीडसह एकूण 1000GB किंवा 1TB डेटा दिला जातो. ही डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग 5Mbps पर्यंत कमी होतो. हे व्हॉईस कॉलिंगसाठी फिक्स्ड लाइन कनेक्शन देखील ऑफर केले जाते. मात्र, यासाठी तुम्हाला स्वतः टेलिफोन विकत घ्यावा लागेल. तसेच आधीच नमूद केल्याप्रमाणे, OTT फायदे देखील या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.
BSNL च्या या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला SonyLIV प्रीमियम, ZEE5 प्रीमियम, Voot आणि YuppTV-Live चे सदस्यत्व मोफत दिले जाईल. मात्र, 749 रुपयांच्या प्लॅनची किंमत GST सह सुमारे 900 रुपये असेल. तसे बघायला गेले तर, हा प्लॅन इतर वैशिष्ट्यांमध्ये खूप चांगला आहे, जरी तो Jio पेक्षा कमी डेटा ऑफर करतो. तुम्हाला जिओ फायबर प्लॅनमध्ये 3.3TB डेटा मिळेल.