दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या नवीन ग्राहकांसाठी बनवलेल्या एका योजनेअंतर्गत पहिल्या दोन महिन्यांसाठी मोबाईल कॉल दर ८० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. कमी झालेल्या दरांचा लाभ केवळ नवीन ग्राहकच घेऊ शकतात. ही ऑफर BSNL च्या आधीपासून उपभोक्ता असलेल्यांना लागू होणार नाही.
ह्या संदर्भात BSNL चे चेअरमनने आणि प्रबंध निर्देशक अनुपम श्रीवास्तव यांनी अशी माहिती दिली आहे की, ‘कंपनीने आपला पाया मजबूत केला आहे. आम्ही नवीन ग्राहकांसाठी मोबाईळ कॉल दर 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन ते नवीन सुविधांचा लाभ घेऊ शकतील.’
त्याचबरोबर त्यांनी अशीही माहिती दिली आहे की, कॉल दर प्रति मिनट आणि प्रति सेकंद दोन्हींच्या बिलिंग प्लानमध्ये कमी केली आहे आणि हे कनेक्शन घेण्याच्या पहिल्या दोन महिन्यांसाठी वैध असेल. BSNL चे कनेक्शन घेणारे नवीन ग्राहकांना प्रति सेकंद प्लानसाठी ३६ रुपये आणि मिनिट प्लानसाठी ३७ रुपयाचा प्लान वाउचर खरेदी करावा लागेल. ज्या प्लान वाउचरची किंमत ३७ रुपये आहे, त्याला खरेदी केल्यावर नवीन ग्राहकांना BSNL नेटवर्कवर लोकल कॉलसाठी १० पैसे प्रति मिनिटच्या दराने पैसे लागतील. STD कॉलचे पण हेच दर असतील. इतर नेटवर्कवर लोकल आणि STD कॉलचे दर ३० पैसे प्रति मिनिट असतील.
तसेच ३६ रुपयांचा प्लान वाउचरचा वापर केल्यावर ग्राहकाला BSNL नेटवर्कवर लोकल आणि STD कॉलसाठी 1 पैसे प्रति 3 सेकंदाचा दर लागू होईल. आणि इतर नेटवर्कवर २ पैसे प्रति तीन सेकंदचे दर लागू होतील.