Best प्लॅन! BSNL च्या प्लॅनमध्ये मिळेल मिळेल 1000GB इंटरनेट डेटा, किंमत 329 रुपयांपासून सुरु। Tech News 

Best प्लॅन! BSNL च्या प्लॅनमध्ये मिळेल मिळेल 1000GB इंटरनेट डेटा, किंमत 329 रुपयांपासून सुरु। Tech News 
HIGHLIGHTS

1000GB सह BSNL चे स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्सची यादी

विशेष म्हणजे या प्लॅन्सची किमंत 329 रुपयांपासून सुरु होते.

हा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह उत्तम डेटा स्पीड प्रदान करतो.

BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी कमीत कमी किमतीत अनेक बेनिफिट्ससह प्लॅन्स आणते. प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सप्रमाणे सरकारी टेलिकॉम कंपनीच्या ब्रॉडबँड पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा एक अप्रतिम प्लॅन्सचा समावेश आहे. जर तुम्ही असा प्लान शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत भरपूर डेटा मिळेल, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे.

हे सुद्धा वाचा: आता येणार मजा! Affordable फोन itel S23+ मध्ये iPhone सारखा फीचर, कॉल आल्यावर दिसेल डायनॅमिक बार। Tech News

या लेखात आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच काही स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्सची माहिती देणार आहोत, जे तुम्हाला एका रिचार्जमध्ये तब्बल 1000GB पर्यंत डेटा देतील. विशेष म्हणजे या प्लॅन्सची किमंत 329 रुपयांपासून सुरु होते. वाचा सविस्तर-

BSNL best plan under Rs 50

1000GB सह BSNL चे स्वस्त प्लॅन

329 रुपयांचा प्लॅन

BSNL कंपनीचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन 329 रुपयांचा आहे. हा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. कंपनी या प्लॅनमध्ये 20 Mbps च्या स्पीडने 1000GB डेटा ऑफर करते. 1000GB डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 4Mbps पर्यंत कमी होतो.

399 रुपयांचा प्लॅन

या यादीतील पुढील प्लॅन 399 रुपयांचा आहे. हा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येतो, जो वापरकर्त्यांना 1000GB पर्यंत अमर्यादित डेटा ऍक्सेस देतो. या प्लॅनमधील डेटाचा स्पीड 30Mbps पर्यंत आहे. 1000GB डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 30Mbps पर्यंत कमी होतो.

799 रुपयांचा प्लॅन

BSNL रुपयांचा 799 रुपयांचा आहे. हा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 100Mbps स्पीडवर 1000GB पर्यंत डेटा एक्सेस मिळतो. यानंतर इंटरनेटचा स्पीड 5Mbps इतका पर्यंत कमी होईल.

जर तुम्ही तुमच्या ऑफिसचे कार्य वर्क फ्रॉम होम कार्यप्रणालीसह कार्य करत असाल आणि तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता असेल. तर कमी किमतीत हे प्लॅन्स तुम्हाला उत्तम डेटा प्रदान करतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo