BSNL केवळ 2,988 रुपयांमध्ये ग्राहकांना 13 महिन्यांची ब्रॉडबँड सेवा देत आहे.
ही FTTH (फायबर-टू-द-होम) सर्व्हिस, Bharat Fibre सर्व्हिस आहे.
कंपनी आपल्या ग्राहकांना भेट म्हणून 1 महिन्याची मोफत सेवा प्रदान करत आहे.
BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड केवळ 2,988 रुपयांमध्ये ग्राहकांना 13 महिन्यांची ब्रॉडबँड सेवा देत आहे. हे कोणतेही जुने डीएसएल किंवा कॉपर वायर कनेक्शन नाही तर, ही FTTH (फायबर-टू-द-होम) सर्व्हिस, Bharat Fibre सर्व्हिस आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून परवडणारी ब्रॉडबँड सेवा शोधत असाल, तर हा BSNL प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. सविस्तरपणे बघुयात या प्लॅनचे सर्व फायदे-
BSNL चा 2988 रुपयांचा प्लॅन 13 महिन्यांच्या वैधतेसह येतो. सहसा हा प्लॅन 12 महिन्यांसाठी चालतो, परंतु हा एक दीर्घकालीन प्लॅन आहे, त्यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांना भेट म्हणून 1 महिन्याची मोफत सेवा प्रदान करत आहे. या प्लॅनमध्ये दरमहा 10GB डेटासह 10Mbps स्पीड मिळेल. 10GB डेटा संपल्यानंतर, स्पीड 1 Mbps पर्यंत कमी होतो.
हा प्लॅन फक्त असा युजर्ससाठी योग्य आहे, ज्यांना एक किंवा जास्तीत जास्त दोन ते तीन उपकरण Wi-Fi नेटवर्कशी जोडायचे आहेत. या प्लॅनमध्ये विनामूल्य फिक्स्ड-लाइन व्हॉइस कॉलिंग कनेक्शन देखील समाविष्ट आहे. तुम्हाला हा प्लॅन हवे असल्यास तुम्ही कंपनीचे नवीन ग्राहक असणे आवश्यक आहे.
तुम्ही आधीपासून सदस्य असल्यास आणि हा प्लॅन खरेदी करण्यास इच्छित असाल तर, तुम्ही तुमचे विद्यमान कनेक्शन बंद करून 2,988 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. जर तुम्ही घरून काम करत असाल तर 10 Mbps स्पीड जास्त काम करण्यासाठी पुरेसा नाही. हा प्लॅन फक्त अशा युजर्ससाठी उत्तम आहे, जे एकटे राहतात आणि डेटा वापरून केवल मूलभूत कार्ये करतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.