BSNL Bharat Fiber : ‘या’ ब्रॉडबँड प्लॅन्सने युजर्सना केले खुश! उत्तम बेनिफिट्ससह मनोरंजनाची भारी सोय

Updated on 08-Jun-2023
HIGHLIGHTS

कंपनी BSNL Bharat Fiber द्वारे फायबर इंटरनेट सुविधा पुरवत असते.

एक हजार रुपयांअंतर्गत येणारे BSNL Bharat Fibres प्लॅन

प्लॅनमध्ये तुम्हाला लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचे लाभ मिळतील.

भारत संचार निगम लिमिटेड BSNL ही भारतातील सर्वात मोठ्या इंटरनेट सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. BSNL किफायती दरात उत्तम प्लॅन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीकडे BSNL Bharat Fiber अंतर्गत उत्तम प्लॅन्स आहेत. या लेखात आपण BSNL चे असे काही प्लॅन पाहणार आहोत, ज्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे.

799 रुपयांचा BSNL Bharat Fibres प्लॅन

हा प्लॅन 100 Mbps च्या एकसमान डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह येते. या प्लॅनमध्ये 1TB FUP डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये मोफत फिक्स्ड-लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन समाविष्ट आहे. एवढेच नाही तर युजर्सच्या मनोरंजनासाठी OTT बेनिफिट्समध्ये Disney+ Hotstar, SonyLIV, ZEE5 आणि YuppTV चे सब्स्क्रिप्शन मिळेल.

999 रुपयांचा BSNL Bharat Fibres प्लॅन

हा प्लॅन 150 Mbps स्पीड आणि 2TB डेटा ऑफर करतो. वरील प्लॅनप्रमाणे यामध्ये देखील मोफत फिक्स्ड-लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन उपलब्ध आहे. तसेच, यात Disney+ Hotstar, लायन्सगेट, शेमारूमी, हंगामा, SonyLIV, ZEE5 आणि YuppTV सारखे OTT फायदे मिळतील.

अधिक माहितीसाठी आणि प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या BSNL ऑफिसला भेट द्या. तसेच, तुम्हाला थेट BSNL च्या अधिकृत वेबसाइटवरून कनेक्शन ऑनलाइन बुक करता येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :