BSNL च्या Best प्लॅनमध्ये मिळतो तब्बल 600GB डेटा, दीर्घकाळ वैधतेसह मिळेल Unlimited कॉलिंगची सुविधा

Updated on 29-Sep-2023
HIGHLIGHTS

BSNL च्या या 600GB डेटासह येणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 1,999 रुपये

या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी Eros Now ची सुविधाही आहे.

1,999 रुपयांचा प्लॅनमध्ये संपूर्ण एका वर्षाची वैधता उपलब्ध आहे.

देशातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL आपल्या ग्राहकांना अनेक प्लॅन्स ऑफर करत असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, BSNL कडे असे काही प्लॅन्स आहेत, जे JIO आणि AIRTEL प्लॅन्सना मागे टाकतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला BSNL च्या जबरदस्त प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये दीर्घकाळ वैधतेसह तब्बल 600GB डेटा उपलब्ध आहे.

bsnl

BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या 600GB डेटासह येणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 1,999 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन बऱ्याच कालावधीपासून उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, ग्राहकांच्या मनोरंजनाची सोय देखील यात केली गेली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी Eros Now ची सुविधाही आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी Eros Now ची सुविधाही आहे.

प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, यात दररोज 100 SMS ची सुविधाही देण्यात आली आहे. लक्षात घ्या की, जर तुम्ही संपूर्ण 600GB डेटा वापरलात तर, इंटरनेटचा स्पीड कमी होईल. खरं तर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. BSNL प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता मिळते. या व्यतिरिक्त, वर सांगितल्याप्रमाणे प्लॅनसह इतर ऑफर देखील उपलब्ध आहेत. यात Eros Now एंटरटेनमेंटचा लाभ ग्राहकांना 30 दिवसांसाठी मिळतो.

फक्त एकच कमतरता

BSNL 4G

लोक BSNL वापरण्यास सक्षम नसल्याचा एक दोष म्हणजे कंपनीकडे भारतभर 4G नेटवर्कची सुविधा अजूनही उपलब्ध झालेली नाही. रिलायन्स Jio आणि Airtel कडे देशात 5G नेटवर्क आहेत, तर BSNL कडे अगदी 4G नसल्यामुळे ते नक्कीच मागे आहे. त्यामुळे लोक BSNL कडे दुर्लक्ष करतात. नाही तर, BSNL कडेही असे काही प्लॅन्स आहेत, जे रिलायन्स जिओ एअरटेल आणि Vi लाही मागे टाकतात.

अलीकडेच दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL येत्या दोन आठवड्यांत 200 ठिकाणी 4G सेवा सादर करण्यास सुरुवात करेल. यासोबतच त्यांनी सांगितले की, यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत BSNL चे 4G नेटवर्क 5G वर अपग्रेड केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, BSNL ने TCS आणि ITI ला 4G नेटवर्क उभारण्यासाठी 19,000 कोटींहून अधिकची आगाऊ ऑर्डर दिली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :