BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी मोफत अनलिमिटेड कॉल्सची घोषणा केली आहे. हे कॉल्स कोणत्याही इतर सर्विस प्रोवायडरवर सुद्धा लागू केले आहेत. ह्या मोफत अनलिमिटेड कॉल्सचा लाभ आपण रविवारीसुद्धा घेऊ शकता. म्हणजेच जर आपण आपल्या BSNL लँडलाइनवरुन इतर सर्विस प्रोवायडरवर कॉल करत असाल, तर रविवारीसुद्धा आपल्याला मोफत अनलिमिटेड कॉल्स करता येतील.
हे मोफत कॉल्स आपल्याला १५ ऑगस्टपासून मिळणे सुरु होईल. त्याचबरोबर BSNL चे म्हणणे आहे की, आमच्या ह्या सेवेच्या माध्यमातून आम्ही लँडलाइन व्यवसायाला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत.
हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
काही दिवसांपूर्वी लँडलाइस व्यवसायाला थोडी उतरती कळा लागलेली. कारण यूजर्स से मोबाईल फोन्सचा वापर लँडलाइनच्या तुलनेत वाढला होता. त्यासाठी BSNL ने हे पाऊल उचलले आहे.
काही महिन्यांपूर्वी BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व नेटवर्क्स वर मोफत कॉल करण्याची सुविधा देणार आहे. ह्याचाच अर्थ असा की, आता BSNL च्या लँडलाइन सेवेच्या माध्यमातून कोणत्याही दुस-या टेलिकॉम ऑपरेटरच्या फोनवर रात्रभर मोफत अनलिमिटेड बोलू शकतो.
हेदेखील वाचा – १६ ऑगस्टला लाँच होणार Le Eco-coolpad कूल 1 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – एअरटेल देणार 15GB पर्यंत मोफत ब्रॉडबँड डाटा