BSNL ने आपल्या फ्रीडम ऑफर ची घोषणा केली आहे, या नवीन घोषणे अंतर्गत कंपनी ने आपले दोन नवीन छोटे प्लान्स लॉन्च केले आहेत, जे अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा बेनिफिट सह येतात.
BSNL ने आपली नवीन फ्रीडम ऑफर लॉन्च केली आहे, या नवीन ऑफर अंतर्गत कंपनी ने आपले छोटे पॅक सादर केले आहेत, ज्यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा बेनिफिट पण मिळत आहेत. ही ऑफर कंपनी ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणली आहे.
विशेष म्हणजे हे प्लान्स कंपनी ने फक्त Rs 9 आणि Rs 29 मध्ये लॉन्च केले आहेत. या ऑफर भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लॉन्च करण्यात आल्या आहेत. हे दोन्ही प्लान्स 10 ऑगस्टला पॅन इंडिया आधारावर संपूर्ण भारतभरात उपलब्ध करण्यात आले आहेत.
Rs 9 वाल्या फ्रीडम ऑफर बद्दल बोलायचे तर या प्लान मध्ये तुम्हाल अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे ज्यात दिल्ली आणि मुंबईचा समावेश नाही. त्याचबरोबर 2GB डेटा ज्याची FUP लिमिट 80Kbps आहे. तसेच यात तुम्हाला 100 SMS पण मिळत आहेत. या प्लान ची वैधता फक्त एकाच दिवसाची आहे. तसेच या प्लानचा लाभ तुम्ही फक्त 10 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट मध्येच घेऊ शकता.
आता Rs 29 मध्ये मिळणारा फ्रीडम प्लान पाहता यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सोबत 2GB डेटा FUP लिमिट 80Kbps सह मिळत आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला 100SMS प्रतिदिन या हिशोबाने मिळतील. या प्लान ची वैधता 7 दिवस आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे पहिल्या प्लान चा फायदा फक्त 25 ऑगस्ट पर्यंत घेता येईल. पण या प्लान मध्ये मिळणारे फायदे 25 ऑगस्ट नंतर पण मिळतील.