एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन्स आणत असतात. Vodafone Idea आणि BSNL ने अलीकडेच 90 रुपयांपेक्षा कमी किमतीचे दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. Vodafone-Idea (Vi) चा 82 रुपयांचा प्लॅन आहे आणि BSNL चा 87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. चला तर जाणून घेऊयात या दोन्ही प्लॅनमध्ये कोणते फायदे उपलब्ध आहेत…
BSNL च्या या प्लॅनसह, कंपनी 14 दिवसांची वैधता देते. त्यामुळे या प्लॅनचे मोफत फायदे वापरकर्त्यांना 14 दिवसांसाठी उपलब्ध राहतील. या प्लॅनसह, कंपनी तुम्हाला दररोज 1GB हाय-स्पीड डेटा देत आहे, त्यामुळे या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून एकूण 14GB डेटा मिळेल.
दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, गती 40Kbps पर्यंत घसरते. डेटासह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध असतील. 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना आउटगोइंग SMSचा लाभ देखील दिला जात आहे.
हे सुद्धा वाचा : POCO F4 5G आज भारतात लाँच होणार आहे, 'अशा'प्रकारे बघा लाइव्ह इव्हेंट
या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा म्हणजे तुम्हाला फक्त 6.21 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळेल. डेटा, कॉलिंग आणि SMSसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू इच्छित नसलेल्या वापरकर्त्यांना हा प्लॅन आवडला आहे. तसेच, या प्लॅनसोबत ONE97 कम्युनिकेशन हार्डी गेम्स मोबाईल सेवा उपलब्ध असेल.
टेलिकॉम कंपनीने Sony Liv सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. SonyLIV मध्ये, तुम्हाला अनेक लोकप्रिय चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही शो पाहता येतील. Sony Liv च्या सहकार्याने, Vodafone-Idea ने एक नवीन प्रीपेड पॅक लॉन्च केला आहे, जो Sony Liv प्रीमियम सबस्क्रिप्शनसह अतिरिक्त डेटा ऑफर करेल.
82 रुपयांचा हा रिचार्ज कंपनीचा ऍड-ऑन प्लॅन आहे. म्हणजेच तुम्हाला हा प्लॅन तुमच्या सध्याच्या प्लॅनसोबत खरेदी करता येईल. हा पॅक तुम्हाला 14 दिवसांच्या वैधतेसह येईल. या वैधतेदरम्यान ग्राहकांना 4GB डेटा दिला जाईल. विशेष बाब म्हणजे ग्राहकांना 28 दिवसांसाठी SonyLIV Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. एवढेच नाही तर पॅकमध्ये Vi Movies आणि TV चाही लाभ मिळेल.