BSNL आणि Airtel च्या दमदार प्लॅन्स मधील फरक, चला तर जाणून घेऊया कि कोणता प्लॅन आहे तुमच्या साठी चांगला

Updated on 05-Apr-2018
HIGHLIGHTS

आज आपण BSNL च्या Rs 379 च्या किंमतीत 120GB डेटा सह येणार्‍या आणि Airtel च्या Rs 349 च्या किंमतीत 70GB डेटा सह येणार्‍या प्रीपेड प्लॅन मधील फरक बघणार आहोत.

टेलीकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे, प्रत्येक कंपनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी रोज नवीन प्लॅन्स सादर करत आहेत. जियो च्या येण्याने स्पर्धा अजूनच तीव्र झाली आहे. जियो चे स्वस्त प्लॅन्स बाजारात आल्यानंतर या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. प्रत्येक कंपनी मग ती सरकारी असो वा खाजगी, आपल्या नव नवीन प्लॅन्स च्या माध्यमातून युजर्सना आकर्षित करण्याचे काम करत आहे. यात 4G प्लॅन्स चा समावेश जास्त आहे, त्यातल्या त्यात BSNL कडे आता पर्यंत त्यांचा 4G नेटवर्क नव्हता पण आता कंपनीने दक्षिण भारतातील काही ठिकाणी आपली 4G सेवा काही दिवसांपुर्वी सादर केली आहे तसेच एयरटेल जवळ त्यांची 4G सेवा आधी पासूनच होती. 

आज आपण या दोन्ही सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या दोन अशाच प्लॅन्स बद्दल बोलणार आहोत. जे काही दिवसांपूर्वी लॉन्च झाले आहेत. BSNL ने आता काही दिवसांपुर्वी केरळातील यूजर्स साठी आपला नवीन Rs 379 च्या किंमतीत येणारा प्लॅन सादर केला आहे, हा प्रीपेड प्लान त्या यूजर्सना लक्षात ठेऊन सादर करण्यात आला आहे, ज्यांना खुप जास्त डेटा लागतो. कंपनी च्या या प्लॅन मध्ये तुम्हाला 4GB डेटा प्रतिदिन सह फ्री कॉल्स पण मिळत आहेत. BSNL ने आपल्या या प्लॅन सह एयरटेल च्या Rs 349 च्या किंमतीत येणार्‍या प्लॅन ला मोठी टक्कर देण्यासाठी सादर केले आहे. एयरटेल च्या या प्लॅन मध्ये तुम्हाला 2.5GB डेटा प्रतिदिन च्या हिशोबाने मिळत आहे, याव्यतिरिक्त यात पण तुम्हाला फ्री कॉल्स मिळत आहेत. चला तर जाणून घेऊया कि या दोन्ही प्लॅन्स मध्ये नेमका फरक काय आहे. तसेच यापैकी कोणता प्लॅन तुमच्यासाठी योग्य असेल. 

BSNL चा Rs 379 मध्ये येणारा प्रीपेड प्लॅन 

जर BSNL च्या या प्लॅन मध्ये मिळणार्‍या डेटा बद्दल बोलायचे झाले तर या प्लॅन मध्ये तुम्हाला 30 दिवसांसाठी संपुर्ण 4GB डेटा प्रतिदिन च्या हिशोबाने मिळत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला पुर्ण महिन्यात 120GB डेटा मिळणार आहे. या प्लॅन मधील डेटा बद्दल बोलायचे झाले तर हा प्लॅन त्या लोकांसाठी चांगला आहे, ज्यांना मोठ्या प्रमाणात डेटा लागतो. पण हेही लक्षात असू दे की BSNL 4G सेवा फक्त केरळ मध्ये उपलब्ध आहे. 

तसेच या प्लॅन मधील कॉल्स इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर या प्लॅन मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग च्या रुपात BSNL टू BSNL च मिळत आहे. याव्यतिरिक्त जर तुम्ही BSNL वरून कोणत्याही इतर नेटवर्क वर कॉल करणार असाल तर तुम्हाला फक्त 30 मिनिट प्रतिदिन कॉल्स फ्री मिळत आहेत. तसेच या प्लॅन मध्ये तुम्हाला SMS पण नाही मिळत. 

Airtel चा Rs 349 मध्ये येणारा प्रीपेड प्लॅन 

या प्लान मधील डेटा बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला डेटा च्या नावावर यात 28 दिवसांसाठी फक्त 70GB डेटा मिळत आहे. म्हणजे या प्लॅन मध्ये तुम्हाला BSNL च्या तुलनेत 1.5GB डेटा कमी मिळत आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला 2.5GB डेटा प्रतिदिन च्या हिशोबाने मिळत आहे. 

याव्यतिरिक्त या प्लॅन मध्ये मिळणार्‍या कॉलिंग इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर या प्लॅन मध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्स मिळत आहेत, यात तुम्ही जरी रोमिंग मध्ये असलात तरी काही फरक पडत नाही. तसेच एयरटेल च्या या प्लॅन मध्ये कोणतेही FUP पण लागू होत नाही. हे पाहत एयरटेल चा हा प्लॅन कॉलिंग च्या बाबतीत उत्तम आहे पण डेटा च्या बाबतीत हा चांगला आहे असे आपण म्हणू शकत नाही. यासोबतच एयरटेल च्या या प्लॅन मध्ये तुम्हाला 100 SMS प्रतिदिन च्या हिशोबाने फ्री मिळत आहेत. 

शेवटी सांगायच झाल तर एवढच सांगेन की तसे पाहता हे दोन्ही प्लॅन्स एकमेकांना चांगली टक्कर देताता, पण असे असुनही हे दोन्ही प्लॅन्स आपापल्या परीने वेगळे आणि शानदार आहेत. जसे की तुम्ही पाहिलेत की डेटा च्या बाबतीत BSNL च्या प्लॅन ला कोणतीही तोड नाही तर कॉलिंग इत्यादीच्या बाबतीत एयरटेल सर्वात चांगला म्हणू शकतो. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला जास्त डेटा हवा आहे की जास्त कॉलिंग. 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :