BSNL च्या अनलिमिटेड प्लान्स मध्ये आता मिळतील रोज फक्त 250 मिनिटे

BSNL च्या अनलिमिटेड प्लान्स मध्ये आता मिळतील रोज फक्त 250 मिनिटे

BSNL इतर टेलिकॉम ऑपरेटर्स सोबत स्पर्धेत राहण्यासाठी सतत आपल्या प्रीपेड प्लान्स मध्ये बदल करत आहे. BSNL सेवेत मोफत सब्सक्रिप्शन, OTT बेनिफिट्स प्रीपेड प्लान्स मध्ये अतिरिक्त डेटा ऑफर्स देत आहे. आता BSNL चे नवीन पाऊल युजर्सना कदाचित आवडणार नाही. 

TelecomTalk च्या रिपोर्ट नुसार, BSNL च्या प्लान्स मध्ये आता अनलिमिटेड कॉल्सचे बेनिफिट मिळणार नाही. BSNL आता आपल्या Rs 186, Rs 429, Rs 485, Rs 666 आणि Rs 1,699 च्या प्लान्स मध्ये आता ट्रूली अनलिमिटेड कॉल्स देणार नाही. युजर्सना रोज 250 फ्री आउटगोइंग दिले जातील. याचा अर्थ असा की यूजर्सना रोज जवळपास 4 तासांपर्यंतच्या मोफत कॉल्सचा लाभ घेऊ शकतो. 

250 मिनिटांची मर्यादा संपल्यावर युजर्सना बेस टॅरिफ नुसार चार्ज द्यावा लागेल जो 1 पैसा प्रति सेकंद असा आहे. प्लान मध्ये जर युजर्सनी 250 मिनिटांचा वापर केला नाही तर ही मिनिटे पुढच्या दिवसात जोडले जाणार नाहीत. 

BSNL ने अलीकडेच अभिनंदन-151 प्लान मध्ये बदल केला आहे. प्लान मध्ये आता 500MB अतिरिक्त डेटा दिला जात आहे म्हणजे युजर्सना रोज 1.5GB डेटा वापरू शकतात. प्लानची वैधता 24 दिवसांची आहे पण लॉन्चच्या वेळी प्लान सोबत रोज 1GB डेटा दिला जात होता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo