प्रसिद्ध सरकारी टेलिकम दिग्गज BSNL ने अलीकडेच त्यांच्या 699 रुपयांच्या प्लॅनची वैधता वाढवली आहे. आता कंपनीने आणखी एका प्लॅनची वैधता वाढवली आहे. होय, युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे कारण कंपनीने 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक्सट्रा बेनिफिट दिला आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, हा BSNL चा प्लॅन एक्स्टेंशन पॅक आहे. यापूर्वी कंपनी या प्लॅनमध्ये 200 दिवसांची वैधता देत होती. चला तर मग बघुयात 999 रुपयांच्या प्लॅनशी संबंधित सर्व तपशील.
BSNL च्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे तर हा कंपनीचा प्लॅन एक्स्टेंशन पॅक आहे. या प्लॅनची वैधता 200 दिवसांची आहे. नवीनतम ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना 15 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर केली जात आहे. नवीन ऑफरनंतर आता यूजर्सना 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 215 दिवसांची वैधता मिळेल.
BSNL च्या 999 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सपोर्ट मिळतो. या अंतर्गत वापरकर्ते लोकल आणि STD कॉलचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये PRBT 2 महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. कंपनीचा हा प्लॅन 200 दिवसांच्या वैधतेसह येतो. मात्र, नवीन ऑफर अंतर्गत, या प्लॅनची वैधता 215 दिवसांची आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, BSNL कंपनीने नुकतीच ही ऑफर 699 रुपयांच्या प्लॅनसह सादर केली होती. या नवीन ऑफर अंतर्गत, फोनमध्ये अतिरिक्त वैधता उपलब्ध झाली आहे. 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 130 दिवसांची वैधता मिळत होती. मात्र, नवीन ऑफरदरम्यान त्यात 20 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे. त्यानुसार, हा प्लॅन 150 दिवसांची वैधता प्रदान करेल.