भारत संचार निगम लिमिटेड BSNL कडे आता अधिकाधिक ग्राहक आकर्षित होत आहेत. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला दीर्घ वैधतेसह स्वस्त रिचार्जबद्दल माहिती देणार आहोत. BSNL चा हा रिचार्ज प्लॅन अशा ग्राहकांसाठी उत्तम आहे, जे दीर्घ वैधतेसह कमी किमतीचा प्लॅन्स शोधत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन 160 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये इतर अप्रतिम बेनिफिट्सदेखील मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
Also Read: Vivo T3 Pro 5G फोनची आज भारतात पहिली Sale, मिड बजेट स्मार्टफोनवर मिळेल हजारो रुपयांची सूट
BSNL च्या या प्लॅनची किंमत 997 रुपये आहे. हा प्लॅन दीर्घकालीन वैधता हवे असलेल्या युजर्ससाठी उत्तम ठरेल. वर सांगितल्याप्रमाणे, हा प्लॅन 160 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये एकूण 320GB म्हणजेच दररोज 2GB दैनिक डेटा उपलब्ध आहे. तर, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS पाठविण्याची सुविधा देखील आहे.
याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अनेक ॲप्सचे सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहेत. ज्यांना डेटासह दीर्घ वैधता आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे.
BSNL ने 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10Mbps स्पीडने इंटरनेट दिले जात होते, मात्र आता हा स्पीड वाढवून 25Mbps स्पीड करण्यात येणार आहे. 299 रुपयांच्या प्लॅनमध्येही पूर्वी वापरकर्त्यांना 10Mbps स्पीडने इंटरनेट दिले जात होते, जे आता 25Mbps पर्यंत वाढवण्यात आले आहे. 329 रुपयांचा प्लॅन 20Mbps स्पीडवर इंटरनेटचा वापर करत होता, पण आता या प्लॅनमध्ये यूजर्सना 25Mbps स्पीड इंटरनेट ऍक्सेस मिळणार आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.