BSNL च्या स्वस्त प्लॅनच्या व्हॅलिडिटीमध्ये मोठी कपात! किंमत 100 रुपयांच्या आत, मिळतात अप्रतिम बेनिफिट्स 

BSNL च्या स्वस्त प्लॅनच्या व्हॅलिडिटीमध्ये मोठी कपात! किंमत 100 रुपयांच्या आत, मिळतात अप्रतिम बेनिफिट्स 
HIGHLIGHTS

BSNL ने आता आपल्या 88 रुपयांच्या स्वस्त प्लॅनची ​​वैधते कमी केली.

BSNL च्या 88 रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्वी एकूण 35 दिवसांची वैधता होती.

अलीकडेच BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 58 आणि 59 रुपयांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले

प्रसिद्ध सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या अप्रतिम प्लॅन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लॅनमध्ये उपलब्ध बेनिफिट्स वाढवत आहे आणि कमी करत आहे. यात कंपनीने आता आणखी एक प्लॅन समाविष्ट केला आहे.

यावेळी, युजर्ससाठी चिंताजनक बातमी आहे कारण BSNL ने आता आपल्या एका स्वस्त प्लॅनची ​​वैधते कमी केली आहे. या प्लॅनची किंमत 88 रुपये इतकी आहे.

Also Read: बहुप्रतीक्षित Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोन भारतात लाँच, तब्बल 10,000 रुपयांच्या Discount सह होणार उपलब्ध

BSNL recharge plans

BSNL चा 88 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 88 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना आता 35 ऐवजी केवळ 30 दिवसांची वैधता मिळणार आहे. होय, इतर टेलिकॉम कंपन्या तुम्हाला साधारण 28 किंवा 30 दिवसांची वैधता ऑफर करतात. मात्र, BSNL च्या या प्लॅनमध्ये पूर्वी तब्बल 35 दिवसांची वैधता उपलब्ध होती. मात्र, आता या वैधतेत कपात करण्यात आलेली आहे. हा प्लॅन आता युजर्ससाठी केवळ 30 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.

बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या पॅकमध्ये कॉलिंग चार्ज 10 पैसे प्रति मिनिट आहे. मात्र, या प्रीपेड प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी डेटा उपलब्ध नाही. हा प्लॅन प्रत्येक टेलिकॉम सर्कलमध्ये नवीन वैधतेसह उपलब्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, BSNL कडे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. कमी किमतीत चांगल्या बेनिफिट्स ऑफर करण्यासाठी BSNL लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे.

100 रुपयांच्या आत येणारे लेटेस्ट प्लॅन्स

अलीकडेच मे महिन्यात BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 58 आणि 59 रुपयांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, 58 रुपयांच्या पॅकमध्ये 7 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा दिला जात आहे. तर, 59 रुपयांच्या पॅकमध्ये 1GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसारखे बेनिफिट्स दिले जात आहेत. हा प्लॅनदेखील 7 दिवसांच्या वैधतेसह आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo