BSNL कडून 87 रुपयांचा प्लॅन ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये Jio आणि Airtel पेक्षा जास्त फायदे दिले जात आहेत. एकीकडे Airtel कडून बेसिक प्लॅनची किंमत 155 रुपये करण्यात आली आहे. तर, Jio चा प्लॅन 119 रुपयांमध्ये येतो. मात्र, Bsnl फक्त 87 रुपयांमध्ये अधिक फायदे देत आहे. बघुयात सविस्तर
हे सुध्दा वाचा : OPPO F17 Pro तब्बल ₹10,000 च्या सवलतीत उपलब्ध, तुमच्या बजेटमध्ये येणार किंमत
BSNL च्या 87 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 14 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा दिला जातो. अशा प्रकारे, ग्राहकांना एकूण 14GB डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. याशिवाय गेमिंगचे फायदे दिले जातात. मात्र, यामध्ये कोणतेही SMS फायदे उपलब्ध नाहीत.
जर तुम्हाला दररोज अधिक डेटा हवा असेल, तर कंपनीचा 97 रुपयांचा 15 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. या प्लॅनमध्ये कोणतेही SMS फायदे दिले जाणार नाहीत. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा येतो. म्हणजेच, या प्लॅनमध्ये एकूण 30GB डेटा उपलब्ध आहे. यासोबतच इतरही अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. या प्लॅनमध्ये मेसेजिंग सुविधा उपलब्ध नाही.
या प्लॅनमध्ये 119 रुपयांमध्ये 14 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण 21 GB डेटा उपलब्ध आहे. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 300SMS ची सुविधा देण्यात आली आहे.