प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेट उपलब्ध
विशेष म्हणजे प्लॅनमध्ये मनोरंजनासाठी OTT ऍप्सचे सदस्यत्व मोफत
सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड BSNL ने अनेक ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करत आहेत. हे प्लॅन्स कमी किमतीत अनेक उत्तम फायद्यांसह येतात. आज आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या BSNL FTTH प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनची किंमत 799 रुपये आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, BSNL चा हा प्लॅन त्या यूजर्ससाठी उत्तम आहे, जे छोटे मोठे ऑफिस चालवतात किंवा वर्क फ्रॉम होम करतात. याशिवाय, BSNL च्या 100 Mbps ब्रॉडबँड प्लॅनप्रमाणे इतर कंपन्यांचे देखील प्लॅन्स आहेत. चला तर मग BSNL च्या प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घेऊयात.
BSNL चा 799 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. त्याबरोबरच, BSNL च्या या प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेट उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 1000GB डेटा उपलब्ध आहे. त्याचबरोबर डेटा संपल्यानंतरही तुम्ही 5Mbps च्या स्पीडने इंटरनेट वापरण्यास सक्षम असणार आहात.
विशेष म्हणजे प्लॅनमध्ये मनोरंजनासाठी Hotstar Super, Lions Gate, Shemaroo, Hungama, SonyLIV, Zee5, Voot आणि YuppTV चे मोफत सदस्यत्व देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला डेटासह OTT ऍप्सचे सब्स्क्रिप्शन हवे असेल तर, BSNL चा हा स्वस्त प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.