जर तुम्हाला दीर्घकालीन वैधता असलेला प्लॅन घ्यायचा असेल तर, आज आम्ही तुमच्यासाठी BSNL चा असाच एक स्वस्त प्लॅन घेऊन आलो आहोत. वापरकर्त्यांना या प्लॅनसह तब्बल 300 दिवसांची वैधता मिळते. सरकारी टेलिकॉम कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी कमी किंमतीत 300 दिवसांच्या वैधतेसह एक अनोखा प्लॅन सादर करते. बघा बेनिफिट्स –
BSNL चा 800 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा प्लॅन वापरकर्त्यांना पूर्ण 300 दिवसांची वैधता देणार आहे. एकदा हा प्लॅन अॅक्टिव्हेट झाल्यावर तुम्हाला पुढील 300 दिवसांच्या रिचार्ज करण्याची गरज नाही. दीर्घकालीन वैधता हवी असल्यास तुम्ही BSNL चा हा प्लॅन घेऊ शकता. प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यात लोकल, STD आणि रोमिंग कॉल्सचा आनंद घेता येईल. मात्र, लक्षात घ्या की, प्लॅनमध्ये उपलब्ध कॉलिंग लाभ केवळ 60 दिवसांसाठी वैध असणार आहे.
त्याबरोबरच, BSNL च्या या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटा मिळतो. पण लक्षात घ्या की, ही सुविधा देखील फक्त 60 दिवसांपुरता मर्यादित असणार आहे. दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट डाउनलोड आणि अपलोड स्पीड 40Kbps पर्यंत कमी होईल.
60 दिवसांनुसार, या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 120GB डेटा उपलब्ध असेल. इतर प्लँन्सप्रमाणे, यात देखील दररोज 100 SMS मोफत मिळतात.जरी हा प्लॅन 300 दिवसांच्या वैधतेसह आला असला तरी, या प्लॅनमध्ये उपलब्ध फायदे वापरकर्त्यांना फक्त 60 दिवसांसाठी उपलब्ध असतील.
300 दिवसांच्या वैधतेचा अर्थ असा आहे की, तुमचा नंबर पुढील 300 दिवसांसाठी सक्रिय राहील जरी 60 दिवसांनंतर तुम्ही आउटगोइंग कॉल, एसएमएस आणि डेटामध्ये प्रवेश करू शकणार नाही. परंतु तुमचा फोन नंबर आणि इनकमिंग सर्व सेवा पूर्ण 300 दिवस सुरु राहतील.