BSNL Best Plans: सरकारी टेलिकॉम कंपनीच्या ‘हे’ आहेत सर्वात अप्रतिम प्लॅन्स, Jio आणि Airtel अशी जबरदस्त स्पर्धा। Tech News 

BSNL Best Plans: सरकारी टेलिकॉम कंपनीच्या ‘हे’ आहेत सर्वात अप्रतिम प्लॅन्स, Jio आणि Airtel अशी जबरदस्त स्पर्धा। Tech News 
HIGHLIGHTS

BSNL ने 699 आणि 999 रुपयांच्या प्लॅन्ससह अतिरिक्त वैधता जाहीर केली.

BSNL च्या 699 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आधीच 120 दिवसांची वैधता उपलब्ध

BSNL च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये या प्लॅनमध्ये 200 दिवसांची वैधता आधीच उपलब्ध

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLम्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडने त्यांच्या काही प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह अतिरिक्त वैधता जाहीर केली आहे. सध्या तुम्हाला या प्लॅन्ससोबत अतिरिक्त वैधता दिली देखील जात आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, BSNL दररोज काही ना काही अप्रतिम बेनिफिट्ससह आपले प्लॅन्स सादर करत असते. किंवा आपल्या प्लॅन्समध्ये अप्रतिम बेनिफिट्सची घोषणा करत असते. सध्या BSNL च्या ग्राहकांनाही अशीच संधी दिली जात आहे.

हे सुद्धा वाचा: भारीच की! Vodafone Idea ने सर्वात स्वस्त 49 रुपयांचा प्लॅनमध्ये केले मोठे बदल, आता मिळेल भरपूर डेटा। Tech News

BSNL Huge Recharge Plan extraa validity

खरं तर, आम्ही तुम्हाला सांगतो की TelecomTalk च्या अहवालात म्हटले आहे की, BSNL ने 699 आणि 999 रुपयांच्या प्लॅन्ससह अतिरिक्त वैधता जाहीर केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या प्लॅन्समध्ये किती एक्स्ट्रा व्हॅलिडिटी दिली जात आहे. ते बघुयात-

BSNL चा 699 रुपयांचा प्लॅन

आम्ही तुम्हाला सांगतो की, BSNL च्या 699 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आधीच 120 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये अतिरिक्त वैधता जोडण्यात आली आहे. आता या रिचार्ज प्लॅनसह ग्राहकांना 30 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जाणार आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 150 दिवसांची वैधता मिळेल.

बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 0.5GB डेटा मिळतो. याशिवाय, प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. त्याबोरबच, PRBT देखील तुम्हाला पहिले 60 दिवस मोफत दिले जाते. PRBT म्हणजे पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन होय. ही एक सेवा आहे, जी ग्राहकांना डफॉल्ट रिंगऐवजी ट्यून सेट करण्याचे स्वातंत्र्य देते.

BSNL
BSNL

BSNL च्या 999 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये या प्लॅनमध्ये 200 दिवसांची वैधता आधीच उपलब्ध आहे. मात्र, आता या प्लॅनसोबत 15 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे. आता तुम्हाला या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 215 दिवसांची वैधता मिळेल. यामध्ये तुमच्यासाठी अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. वरील प्लॅनप्रमाणे, या प्लॅनमध्ये 2 महिन्यांसाठी मोफत PRBT सेवा देखील उपलब्ध आहे.

वरील दोन्ही प्लॅन्सचे बेनिफिट्स आणि किंमत बघता BSNL भारतातील सर्वात आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Airtel आणि Jio ला जबरदस्त स्पर्धा देत आहे. कारण BSNL प्लॅन्समध्ये उपलब्ध असलेले फायदे इतके वेगळे आणि उत्कृष्ट आहेत की तुम्ही BSNL वर सहज स्विच करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo