एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL नेहमीच आपल्या आकर्षक अपडेट्समुळे बातम्यांमध्ये असते. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅन्सच्या किमती वाढवल्यापासून BSNL दूरसंचार उद्योगात चर्चेत आहे. रिचार्ज प्लॅनमधील अपडेट्सपासून ते 4G नेटवर्कमधील प्रगतीपर्यंत BSNL बद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. आता, वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की, ही कंपनी आपली 5G सेवा लवकरच सुरू करण्यासाठी सज्ज होत आहे.
पुढे आलेल्या वृत्तानुसार, भारत संचार निगम लिमिटेड BSNL चे प्रधान महाव्यवस्थापक, आंध्र प्रदेश, एल. श्रीनू यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले होते की, BSNL 2025 मध्ये संक्रांतीपर्यंत 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. होय, कंपनी सध्या 5G रोलआउट शक्य तितक्या लवकर सुलभ करण्यासाठी टॉवर आणि इतर आवश्यक उपकरणांसह पायाभूत सुविधा अपग्रेड करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने मुंबई आणि दिल्लीमध्ये 4G नेटवर्कचे लाँच टीज केले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मुंबई आणि दिल्लीतील लोकांना लवकरच 4G सेवा मिळतील, असे कंपनीने थेट सांगितले नाही. परंतु, एका Video मध्ये BNSL आणि MTNL या दोन्हींचे लोगो उपस्थित आहेत आणि हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीबद्दल बोलले जात आहे. BSNL, MTNL चे मोबाईल नेटवर्क चालवत आहे, हे सर्वांना माहिती आहे.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, सुयोग टेलिमॅटिक्स ही अलीकडेच सूचीबद्ध झालेली कंपनी FY25 मध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) साठी 500+ टॉवर स्थापित करणार आहे. एवढेच नाही तर, ही कंपनी पुढील वर्षी Vodafone Idea (Vi) आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) साठी 3000+ टॉवर्स देखील स्थापित करेल, अशी देखील माहिती मिळाली आहे.
BSNL चे 4G तंत्रज्ञान 5G वर अपग्रेड करण्यायोग्य बनवण्यात आले आहे. म्हणजेच BSNL ला 5G वर अपग्रेड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. 5G रोलआउट लवकरच त्या भागात सुरू होईल, जिथे BSNL ने आधीच 4G सेवा सुरू केली आहे, असे म्हटले जात आहे.