5G सेवा लवकरच सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL द्वारे लाँच केली जाणार आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत 5G इंटरनेट सेवेच्या बाबतीत Jio आणि Airtel चे वर्चस्व होते. सुमारे एक वर्षापूर्वी Jio आणि Airtel ने 5G सेवा सुरू केली होती. सध्या दोन्ही कंपन्या 5G सेवा मोफत प्रदान करत आहेत. परंतु, आता BSNL कंपनी Jio आणि Airtel च्या वर्चस्वाशी जबरदस्त स्पर्धा करणार, असे म्हटले जात आहे.
ताज्या अहवालानुसार, BSNL 2024 मध्ये शक्य तितक्या 4G सेवेचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनी किमान 100,000 बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (BTS) स्थापित करेल, असे देखील मानले जात आहे. यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये सुमारे 2,000 BTS बसवण्यात आले आहेत, तर BSNL 5G सेवा 2025 मध्ये सुरू होणार आहे, असे लीकद्वारे समोर आले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, BSNL दिल्ली आणि मुंबईमध्ये नेटवर्क कॉलिटी इम्प्रुव्हमेंटवर भर देत आहे. कंपनी बँडविड्थ आणि नेटवर्क गुणवत्ता सुधारत आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस भारतात पूर्णपणे 4G सेवा सुरू करेल. यानंतर, नेटवर्कमध्ये सुधारणा दिसून येईल, असे सांगण्यात आले आहे.
भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Airtel आणि Jio ने 2022 वर्षी 5G सर्व्हिस रोलआऊट केली. आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio 5G तंत्रज्ञान Airtel 5G पेक्षा चांगले आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे Jio चा वेग Airtel तुलनेने चांगला असेल. मात्र, ते तुम्ही राहता त्या क्षेत्रावर अवलंबून आहे. त्याबरोबरच, Jio 5G प्लॅन Airtel पेक्षा थोडा स्वस्त आहेत. Jio कडे Airtel पेक्षा जास्त नेटवर्क कव्हरेज आहे आणि भविष्यात लवकरच तुम्हाला भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात Jio कव्हरेज दिसेल.