BSNL Plan: आता 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल Unlimited सुपर हाय-स्पीड डेटा, बघा सर्व डिटेल्स
BSNL ने 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये केले आकर्षक बदल
आता या BSNL प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्वीपेक्षा हाय-स्पीड डेटा मिळणार आहे.
BSNL प्लॅनमध्ये तुम्हाला लोकल आणि STD अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळेल.
BSNL Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच आपल्या आकर्षक प्लॅन्समुळे चर्चेत असते. दरम्यान, आता कंपनीने आपला लोकप्रिय विद्यमान ब्रॉडबँड प्लॅन अपग्रेड केला आहे. आता हा प्लॅन वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा चांगला डेटा लाभ देत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, BSNL च्या 599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जाणून घेउयात या प्लॅनच्या जुन्या आणि नवीन अपग्रेडशी संबंधित सर्व तपशील.
Also Read: आगामी Vivo X Fold3 Pro फोनची भारतीय लाँच डेट जाहीर, जबरदस्त फीचर्ससह लवकरच होणार दाखल!
BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन
BSNL ने काही काळापूर्वी म्हणेजच 2020 या वर्षी आपल्या ग्राहकांसाठी 599 रुपयांचा Fiber Basic Plus प्लॅन युजर्ससाठी लाँच केला होता. पूर्वी या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 60Mbps डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह 3.3TB मासिक डेटा ऑफर केला जात होता. त्याबरोरबच, डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2Mbps पर्यंत कमी होत होती.
आता कंपनीने 599 रुपयांच्या प्लॅनचे फायदे अपग्रेड केले आहेत. आता या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्वीपेक्षा हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. होय, या प्लॅनमध्ये यूजर्सना 60Mbps डाउनलोड आणि अपलोड स्पीडऐवजी 100Mbps डाउनलोड आणि अपलोड स्पीड मिळेल. हा प्लॅन आता तुम्हाला तब्बल 4000GB मासिक डेटा प्रदान करेल. डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 4Mbps पर्यंत कमी होतो. त्याबरोबरच, यात तुम्हाला लोकल आणि STD अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळेल.
BSNL चा 599 रुपयांचा Fiber Plan
BSNL ब्रॉडबँड पोर्टफोलिओमध्ये आणखी 599 रुपयांचा फायबर प्लॅन समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा कॉलिंगसह मनोरंजनाची देखील सोय मिळेल. डेटा बेनिफिटबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन तुम्हाला 75Mbps स्पीडसह 4000GB डेटाचा लाभ देतो. OTT सबस्क्रिप्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि कॉलिंगसाठी Disney + Hotstar Super चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. या प्लॅनमध्ये डेटासोबत कॉलिंगचे फायदेही मिळतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile