Good News! BSNL 4G सर्व्हिस ऑगस्ट 2024 मध्ये होणार लाईव्ह? Jio आणि Airtel ला बसेल का धक्का? Tech News
भारत संचार निगम लिमिटेड BSNL त्यांचे 4G नेटवर्क ऑगस्ट 2024 जारी करेल.
BSNL कंपनीने आतापर्यंत देशात 9,000 4G टॉवर्स लावले आहेत.
BSNLच्या 4G नेटवर्कच्या रोलआउटमुळे JIO आणि Airtel ला मोठा फटका बसणार
रिलायन्स Jio आणि भारती Airtel ची 5G सर्व्हिस लाइव्ह होऊन आता जवळपास संपूर्ण देशात त्यांचे 5G नेटवर्क पसरले आहे. दरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL च्या 4G सेवेबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा आणि चाचण्या सुरु आहेत. मात्र, आता कंपनी त्यांचे 4G नेटवर्क ऑगस्ट 2024 जारी करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, कंपनीने 4G सेवेच्या लॉन्चची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
लक्षात घ्या की, सरकारी दूरसंचार कंपनीने 4G नेटवर्कवर काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. BSNL ऑगस्ट 2024 मध्ये त्यांचे 4G नेटवर्क आणण्यास सुरुवात करेल, असा दावा नव्या अहवालात करण्यात आला आहे.
Jio आणि Airtel ला बसेल धक्का?
देशभरात BSNLच्या 4G नेटवर्कच्या रोलआउटमुळे JIO आणि Airtel ला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. कारण सरकारी कंपनीचे नेटवर्क ग्राहकांच्या खिशांना अधिक परवडणारे असू शकते. मात्र कंपनीने 4G प्लॅन्सच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. BSNL चे 4G नेटवर्क सध्या बीटा टप्प्यात आहे, परंतु येत्या काही महिन्यांत लवकरच ते देशभरात अधिकाधिक ठिकाणी लाँच करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
BSNL 4G
TCS, Tejas Networks आणि सरकारी ITI यांना BSNL कडून 4G आणि 5G सेवांसाठी 19,000 कोटी रुपये मिळाले आहेत. याअंतर्गत BSNL देशात 4G आणि 5G सेवांचा विस्तार करणार आहे, असे सांगितले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नुकतीच एक बातमी आली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की “BSNL 4G आणि 5G नेटवर्कसाठी देशभरात सुमारे 1.12 लाख टॉवर स्थापित जेल जातील.”
दरम्यान, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने आतापर्यंत 9,000 4G टॉवर्स लावले आहेत. ज्यापैकी 6,000 टॉवर पंजाब, उत्तर प्रदेश पश्चिम, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा सर्कलमध्ये ऍक्टिव्ह आहेत.
BSNL 4G स्पीड
BSNL च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, “BSNL 4G सेवा ऑगस्टपासून देशात सुरू होईल. BSNL 4G नेटवर्कवर 40-45mbps पर्यंत स्पीड प्रदान केला जाईल, असे देखील रिपोर्टमध्ये सांगितले आहे. याव्यतिरिक्त, BSNL ची 4G सेवा 700 MHz वर सुरू केली जाईल आणि पायलट प्रोजेक्ट दरम्यान ती 2,100Mhz बँडवर नेली जाईल.” अशी माहिती ताज्या अहवालात सांगण्यात आली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile