सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL च्या 4G नेटवर्कची प्रतीक्षा युजर्सना बऱ्याच दिवसांपासून होती. अखेर पंजाबमध्ये BSNL 4G लाँच करण्यासाठी भारत संचार निगमने सर्व तयारी केली आहे. या महिन्याच्या अखेरीस पंजाबमध्ये BSNL 4G सादर केला जाण्याची शक्यता आहे. खरं तर, BSNL 4G आधीच देशाच्या काही भागात सुरु आहे. मात्र, BSNL 4G अद्याप देशातील सर्व भागात पोहोचलेले नाही.
आम्ही तुम्हाला सांगतो की, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे टेक्नॉलॉजी आणि उपकरणे वापरून BSNL द्वारे पहिले व्यावसायिक लाँच केले जाणार आहे. जर आपण Livemint च्या अहवालावर नजर टाकली, जी सध्या इंटरनेटवर फिरत आहे, तर त्यानुसार BSNL 4G लाँच अमृतसर आणि फिरोजपूरमध्ये होणार आहे. या शहरांमध्ये BSNL 4G ची टेस्टिंग आधीच झाली आहे. म्हणजेच तेथील जनतेला याबाबत कल्पना आहे.
TelecomTalk च्या रिपोर्टवर नजर टाकली तर, BSNL च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 4G नेटवर्कसाठीचे सिम लाँच झाल्यानंतर सुमारे 7-10 दिवसात विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. याच अधिकार्याकडून अशीही माहिती मिळत आहे की, या शहरांव्यतिरिक्त पंजाबच्या इतर शहरांमध्येही लवकरच 4G सुरू होणार आहे.
कारण पंजाब हा कंपनीसाठी कमाईचा मोठा स्रोत आहे, असे म्हटले जात आहे. BSNL ला देशातील ज्या शहरांमध्ये अधिक रेव्हिन्यू मिळत आहे, त्या सर्व शहरांमध्ये लवकरच BSNL 4G सादर केला जाण्याची शक्यता आहे, असेही म्हणता येईल. अशाप्रकारे, आता 4G नेटवर्कच्या लिस्टमध्ये BSNL चे नाव देखील सामील झाले आहे.