भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 4G सेवा कधी सुरु करणार, यावर आता पर्यंत बऱ्याच अफवा सुरु होत्या. पण अखेर या अफवांना पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. कंपनी लवकरच भारत 4G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार, कंपनी आपली 4G सेवा पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सुरू करणार आहे.
यासाठी कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून उपकरणे घेतली आहेत, अशी माहिती मिळाली आहे. BSNL 4G ची चाचणी पंजाबमधून सुरू होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळाली आहे.
पुढील महिन्यात 4G सेवा होणार लाँच
TCS च्या मालकीच्या तेजस नेटवर्कने आधीच सुमारे 50 साइट्ससाठी उपकरणे पुरवली आहेत. यासाठी C-DOT सॉफ्टवेअर पॅच अपग्रेड लागू करण्यासाठी पुढे जाऊ शकते. "4G लॉन्चिंगसह सुमारे 100 साइट्स मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर BSNL ची 4G सेवा एप्रिल 2023 मध्ये होईल.", असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
BSNL 4G ची चाचणी पंजाबमधून सुरू होणार
BSNL 200 साइट्ससाठी प्री ऑर्डर घेत आहे. ज्याचा उपयोग पंजाबच्या तीन जिल्ह्यांमध्ये 4G लाँच करण्यासाठी केला जाईल. ज्यामध्ये फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोट किंवा तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. परंतु, TCS च्या अंतिम निविदेला सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. TCSLA मार्च अखेरीस एक लाख 4G साइट्ससह संपूर्ण निविदा देण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळवू शकते, असे म्हटले जात आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.