BSNL युजर्सची तर मज्जाच मजा! 499 रुपयांचा प्लॅनच्या किमतीत मोठी कपात, मिळतो 3300GB डेटा
BSNL ने खास मान्सून डबल बोनान्झा ऑफर सादर केली आहे.
या ऑफर अंतर्गत BSNL ने 499 रुपयांच्या प्लॅनची किंमत कमी केली आहे.
BSNL च्या 'या' नवीन ग्राहकांना या प्लॅनअंतर्गत 1 महिन्याची मोफत सेवा देखील दिली जाणार आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड कंपनीकडे युजर्ससाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आहेत. जर तुम्ही सरकारी टेलिकॉम कंपनीचे ब्रॉडबँड यूजर असाल तर कंपनी तुमच्यासाठी खास मान्सून डबल बोनान्झा ऑफर सादर करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीने सध्याच्या 499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनची किंमत कमी केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, BSNLच्या या ब्रॉडबँड प्लॅनची नवी किंमत-
499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनच्या किमतीत कपात
वर सांगितल्याप्रमाणे, BSNL ने आपल्या यूजर्ससाठी मान्सून डबल बोनान्झा ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनीने आपल्या लोकप्रिय 499 रुपयांच्या भारत फायबर ब्रॉडबँड प्लॅनची किंमत कमी केली आहे. त्यामुळे आता ऑफर अंतर्गत युजर्सना हा प्लॅन केवळ 399 रुपये प्रति महिना किमतीत मिळेल. त्याबरोबरच, जर तुम्ही नवीन ब्रॉडबँड ग्राहक असाल तर तुम्हाला या प्लॅन अंतर्गत 1 महिन्याची मोफत सेवा देखील दिली जाणार आहे.
#MonsoonDoubleBonanza Alert!
— BSNL India (@BSNLCorporate) August 5, 2024
Enjoy our Fibre Basic Plan at just ₹399/month, down from ₹499! Plus, get your first month FREE! Limited time offer. T&C apply.
Say ‘Hi’ on WhatsApp at 1800-4444 for more details!#BharatFibre #BSNLFTTH #BSNL #SwitchToBSNL pic.twitter.com/rNKIvGDDsk
ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
नवीन Bharat Fibre ब्रॉडबँड कनेक्शनसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर 1800-4444 वर ‘Hi’ पाठवावे लागेल. लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त सुरुवातीच्या 3 महिन्यांसाठी उपलब्ध असेल. यानंतर या प्लॅनची किंमत 499 रुपये इतकी होईल.
बेनिफिट्स
ऑफर अंतर्गत प्लॅनची किमत कमी झाली असेल तरीही, यात मिळणारे बेनिफिट्स पूर्वीप्रमाणेच आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला 60Mbps स्पीडसह 3300GB डेटाचा ॲक्सेस मिळेल. डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 4 Mbps पर्यंत कमी होतो. या डेटासह तुम्ही तुमचे ऑफिस वर्क, मनोरंजनासाठी OTT वर व्हीडिओ बघणे, तसेच इतर महत्त्वाची कार्ये निश्चिंत होऊन करू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile