BSNL : आता मनसोक्त कॉलिंग करा, कमी किमतीत मिळतेय 90 दिवसांची वैधता

Updated on 17-Apr-2023
HIGHLIGHTS

BSNL चा 439 रुपयांचा प्लॅन

BSNL चा हा ओन्ली कॉलिंग प्लॅन आहे.

प्लॅनमध्ये युजर्सना संपूर्ण तीन महिन्यांची वैधता मिळणार आहे.

BSNL ने ग्राहकांसाठी एक मस्त प्लॅन लाँच केला आहे. आता तुम्ही आपल्या मैत्रिणीसोबत बराच वेळ तेही अडथड्याशिवाय गॉसिप करू शकता. BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी कॉलिंग ओन्ली प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन नावाप्रमाणेच बराच वेळ कॉलवर गप्पा मारणाऱ्या ग्राहकांसाठी आणले गेला आहे. त्यासोबतच, त्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे ज्यांचा इंटरनेट डेटा वापर कमी असतो. 

BSNL चा 439 रुपयांचा प्लॅन

हा प्रीपेड प्लॅन मागील वर्षी दिवाळीमध्ये लाँच करण्यात आला होता. BSNL च्या प्लॅनमध्ये युजर्सना 90 दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये संपूर्ण वैधतेदरम्यान युजर्सना अमर्यादित कॉलिंग मिळेल. यामध्ये रोमिंग, लोकल, STD आणि इन होम नॅशनल रोमिंगदेखील समाविष्ट करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त प्लॅनमध्ये एकूण 300 SMSची सुविधा मिळणार आहे. दीर्घकाळ वैधता हवी असलेल्या युजर्ससाठी हा प्लॅन सर्वोत्तम ठरणार आहे.

BSNL कडे दीर्घकाळ वैधतेसह येणारा आणखी एक प्लॅन आहे, ज्याची वैधता एका वर्षाची आहे : 

BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन

BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन संपूर्ण एका वर्षाच्या वैधतेसह येतो. वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्येही तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळते. तसेच या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधतेदरम्यान 600GB डेटा देण्यात आला आहे. वारंवार रिचार्ज करण्यापासून वैतागलेल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन सर्वोत्तम आणि किफायतशीर ठरणार आहे. 

इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे प्लॅन्स तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत उत्तम बेनिफिट्स देतात. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :