भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. BSNL चे असे अनेक प्लॅन आहेत, जे वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहेत. BSNL चे हे प्लॅन खाजगी कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा चांगले फायदे देतात. आज आम्ही BSNLच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. जो प्लॅन AIRTEL आणि VI वर देखील भारी पडतो.
BSNL च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 80 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. विशेषत: परवडणाऱ्या किमतीत मध्यम-मुदतीची योजना शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड 80 Kbps पर्यंत कमी होईल. प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. याशिवाय वापरकर्त्यांना BSNL ट्यून्स आणि लोकधुन कंटेंटचा फ्री ऍक्सेस मिळतो.
हे सुद्धा वाचा : Blaupunkt BTW100 TWS इयरबड्स भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह मिळतील जबरदस्त फीचर्स
BHARTI AIRTEL च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2.5GB डेटा प्रतिदिन वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Airtel Thanks बेनिफिट्स मिळतात. याशिवाय, या प्लॅनमध्ये डिझनी + हॉटस्टार सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी उपलब्ध आहे.
व्होडाफोन आयडियाची हा प्लॅन एअरटेलच्या प्लॅनप्रमाणेच फायदे देतो. मत, दोन्ही प्लॅन्समध्ये उपलब्ध अतिरिक्त फायद्यांमध्ये फरक आहे. Vi च्या प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी Hero Unlimited बेनिफिट आणि Disney+ Hotstar Mobile बेनिफिट मिळेल. याशिवाय, प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV VIP चा ऍक्सेस देखील मिळतो.