BSNL Plan: तब्बल 150 दिवसांच्या वैधतेसह मिळेल भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंग, किंमतही कमी 

BSNL Plan: तब्बल 150 दिवसांच्या वैधतेसह मिळेल भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंग, किंमतही कमी 
HIGHLIGHTS

अलीकडेच सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

BSNL कंपनीने 150 दिवसांच्या वैधतेसह कमी किमतीत भारी प्लॅन ऑफर करते.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 2GB डेटा मिळतो.

एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL च्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अर्थात, याचे कारण या यावर्षी जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत झालेली वाढ होय. तसेच, BSNL ग्राहकांना कमी किमतीत सर्वोत्तम बेनिफिट्ससह प्लॅन्स ऑफर करते. या रिपोर्टमध्ये, आज आम्ही तुमच्यासाठी BSNL च्या लॉंग टर्म प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. या प्लॅनमध्ये 150 दिवसांच्या वैधतेसह अनेक अप्रतिम बेनिफिट्स मिळतात. जाणून घेऊयात BSNL प्लॅनची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Motorola Edge 50 Neo वर जबरदस्त Discount उपलब्ध! जाणून घ्या अप्रतिम डील आणि Powerful स्पेक्स

bsnl 150 days validity plan

150 दिवसांच्या वैधतेसह BSNL प्लॅनची किंमत

BSNL कंपनीने 150 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनची ​​किंमत 400 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. ज्या वापरकर्त्यांना कमी किंमतीत दीर्घ वैधता हवी आहे, हा प्लॅन सर्वोत्तम ठरेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, BSNL वापरकर्त्यांसाठी या प्लॅनची ​​किंमत 397 रुपये आहे, ज्यामध्ये 150 दिवसांची दीर्घ वैधता उपलब्ध असेल.

बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 2GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळणार आहेत. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे अतिरिक्त फायदे फक्त 30 दिवसांसाठी उपलब्ध असतील. होय, मोफत कॉलिंग, डेटा आणि SMS चा लाभ केवळ 30 दिवसांसाठी उपलब्ध असेल, तर वैधता 150 दिवसांपर्यंत असेल. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.

BSNL ऑफर

BSNLकडून सध्या एक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीत रिचार्ज करावे लागेल. बेनिफिट्समध्ये या यूजर्सना 24GB डेटा मिळणार आहे. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच 24 ऑक्टोबरपर्यंत LIVE असेल.

BSNL 5G

वर सांगितल्याप्रमाणे, भारत संचार निगम लिमिटेड BSNL गेल्या काही महिन्यांपासून दूरसंचार क्षेत्रात चर्चेत आहे. दरम्यान, सरकारी कंपनीने आता 5G सेवेची चाचणी सुरू केली आहे. कंपनी लवकरच आपली 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे, अशा बातम्या सतत येत आहेत. ताज्या अहवालानुसार, BSNL प्रधान महाव्यवस्थापक, आंध्र प्रदेश, एल. श्रीनू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, BSNL जानेवारी 2025 मध्ये त्यांची 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo